ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून आमदार देवयांनी फरांदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर नवाब मलिक यांच्या कन्या आमदार सना मलिक यांनी विधिमंडळात आक्रमक भाषण केले, पण त्याचा भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी परखड शब्दात समाचार घेतला.
फरांदे यांच्या प्रस्तावावर बोलताना सना मलिक म्हणाल्या की, अत्याचार फक्त मुस्लिम महिलांवरच होत नाहीत. पाकिस्तानने कुराणची अंमलबजावणी केली आहे आणि कुराणमध्ये जे सांगितले त्याचे पालन आम्ही करतो.
मला प्रश्न आहे की, लक्षवेधीत देवयानी फरांदेंनी प्रश्न उपस्थित केले. असे अत्याचार फक्त मुस्लिम महिलांवरच होत आहेत का? बहुपत्नित्व अर्थात पॉलिगॅमीला मुस्लिमांत परवानगी आहे ती मुस्लिमांच्या कायद्यांनुसार. पाकिस्तानमध्ये मुस्लिम कायदा आहे. कुराणची अंमलबजावणी तिथे करण्यात आली आहे. कुराणमध्ये जे सांगितले आहे, त्याचे आम्ही पालन करतो. कुराणात जर काही म्हटले असेल आणि त्याची अंमलबजावणी पाकिस्तान करत असेल तर भारतातही तसा कायदा असावा आणि आम्ही त्याची मागणी करतो.
हे ही वाचा:
मुंबईत ९२५ एकरवर पुनर्विकासाचा मेगा प्लॅन!
आंध्र प्रदेशात सापडला सुवर्णखजिना
पाकिस्तानविरोधी आंदोलनासाठी पीओकेमध्ये शाळकरी मुले, महिला रस्त्यावर
अरूप रॉय तृणमूलच्या अध्यक्षपदी; बंडखोर गटाचा दावा
ट्रिपल तलाकचे अनेक प्रकार आहेत. तलाक ए हसन, तलाक ए अहसान हे आम्ही मानतो. तलाक ए बिद्दत आम्ही मानत नाही. ट्रिपल तलाक कायदा रद्द करण्यात आला तेव्हा ज्याला आमची मान्यताच नाही तरी तो रद्द करण्यात आला. बहुपत्नित्व फक्त मुस्लिमांतच आहे का, अन्य धर्मातही बहुपत्नित्व मान्य आहे. मुस्लिम धर्मात बहुपत्नित्वाची पद्धत सांगण्यात आली आहे. त्यासंदर्भातला कायदाच आपल्याकडे यायला हवा तसेच बहुपत्नित्वाला मान्यता दिली गेली पाहिजे.
यावर आमदार अतुल भातखळकर यांनी सुनावले की, लक्षवेधी ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का, यासाठी आहे. सन्माननीय सदस्य ( सना मलिक) त्याठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातील परंपरा याचे लेक्चर देत आहेत. ते लेक्चर आम्हाला ऐकायचे नाही. हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालत नाही.







