33 C
Mumbai
Saturday, May 14, 2022
घरराजकारण'पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं'

‘पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा शिवसनेने मुंबईकरांना पिण्याचं शुद्ध पाणी द्यावं’

Related

मुंबईत २०२१ ते २०२२ या वर्षात महापालिकेकडे तब्बल १० हजार पाण्यासंबंधीच्या तक्रारी आल्या आहेत. मालाड, कांदिवली भागातून सर्वाधिक तक्रारी आल्या असून कुलाबा, परळ येथून तक्रारी कमी आल्याचे अहवालात समोर आले आहे. मुंबईला पुरवठा होत असलेल्या पाण्यापैकी सुमारे २५ ते २७ टक्के पाणी हे गळतीत वाया जाते. तर काही जलवाहिन्या या नाले आणि गटारांच्या जवळून जातात त्यामुळे पाण्यामध्ये दुषित पाणी मिसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जलवाहिन्यांची दुरावस्था यामुळे मुंबईकरांना दुषित पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असून तब्बल १० हजार तक्रारी वर्षभरात पालिकेकडे केल्या आहेत. यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महानगरपालिकेला आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.

“भूमिगत जलवाहिन्यांमधून होणारी गळती आणि नाले, गटारातून जलवाहिन्यांमध्ये शिरणारे दूषित पाणी यामुळे गेल्या वर्षभरात महापालिकेकडे सुमारे १० हजार दूषित पाण्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिवसेनेने विरोधकांना ऊठसूट पाणी पाजण्याच्या बाता मारण्यापेक्षा मुंबईकरांना पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे,” असा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी महापालिकेला आणि शिवसेनेला लगावला आहे.

हे ही वाचा:

चारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण

“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”

अहवालाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत एकूण १० हजार ८२९ तक्रारी आल्या आहेत. १० हजार ३२९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तर केवळ ५१९ तक्रारी शिल्लक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,979चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,210सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा