25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणसरकारी योजनांच्या लाभार्थींची ठेवणार अनोखी 'आठवण'

सरकारी योजनांच्या लाभार्थींची ठेवणार अनोखी ‘आठवण’

एक कोटी लाभार्थीबरोबर घेणार फोटो

Google News Follow

Related

लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहेत. याच उपक्रमाअंतर्गत भाजप पक्ष एक कोटी ‘सेल्फी विथ बेनेफिशिअरी अभियानाला’ सुरवात होणार आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनीथी श्रीनिवासन म्हणाल्या  की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या अभियानाला सुरवात होणार आहे. आज संध्यकाळी चार वाजता या अभियानाची सुरवात होणार आहे. तर महाराष्ट्रात या अभियानाची सुरवात केंद्रीय मंत्री ‘स्मृती इराणी’ करणार आहेत. कार्यकर्त्यांना नमो  अँपवर काही माहितीसह सेल्फी अपलोड करावी लागणार आहे.

सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयावर हे अभियान संपूर्ण देशात एकाच वेळेस सुरु करण्यात येणार आहे.  प्रत्येक कार्यक्रमात किमान ५०० लाभार्थींना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहेत. हे अभियान फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत भाजपच्या महिला कार्यकर्त्या उज्वला, आयुष्मान भारत यासारख्या योजनांचा लाभ ज्या महिलांनी घेतला आहे त्या महिला आपला सेल्फीने घेऊन या अभियानांतर्गत त्यांना अँप वर अपलोड करावयाची आहे.

हे ही वाचा:

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

या उपक्रमासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्या ना तालुका पातळीवर प्रशिक्षण देण्यात येणार आले आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल रविवारी सर्व सरचिटणीस यांची भेट घेतली आणि मार्गदर्शन केले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जाते. या बैठकीत सहा राज्यातील निवडणुकीबाबत या चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. देशभरातील दहा लाख मतदान केंद्रांवर भाजप पक्षाला आणखी चांगली बळकटी येण्यासाठी पक्ष मोहीम चालवत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भाजपचा मुख्य अजेन्डा आणि फोकस हा संघटन बळकट करण्यावरच असणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा