31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषआपत्तीग्रस्तांच्या मदत निधीत भरीव वाढ..जाणून घ्या किती

आपत्तीग्रस्तांच्या मदत निधीत भरीव वाढ..जाणून घ्या किती

राज्य सरकारचा मोठा निर्णय

Google News Follow

Related

राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य आपत्ती निधीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे.

या सुधारणा २०२५-२६ पर्यंत लागू असतील.
या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे. मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या ४ लाख रुपयांच्या निधीत बदल करण्यात आलेला नाही ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास आधीच्या५९ हजार १०० रुपयांच्या ऐवजी आता ७४ हजार रुपयांची मदत मिळेल. ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास आधीच्या २ लाख रुपयांच्या तुलनेत आता २.५० लाख रुपये मिळतील.

जखमी व्यक्ती एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात असल्यास आता १६ हजार रुपये मिळतील. आधी १२ हजार ७०० रुपयांचा निधी मिळत होता.एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी आता ४ हजार ३०० रुपयांच्या ऐवजी ५ हजार ४०० रुपयांचा निधी मिळेल.

वाढवण्यात आलेला निधी असा (कंसात विद्यमान निधी):-

दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र/घर पाण्यात बुडालेले असल्यास/घरे पूर्णत: वाहून गेली असल्यास/ पूर्णत: क्षतीग्रस्त झाल्यास प्रति कुटुंब – २ हजार ५०० (बदल नाही). सामानाच्या नुकसानीकरिता प्रति कुटूंब – २ हजार ५०० (बदल नाही).

पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या/कच्च्या घरांसाठी सखल भागात– १ लाख २० हजार रुपये ( ९५ हजार १००). दुर्गम भागातील घरांसाठी – १ लाख ३० हजार (१ लाख १ हजार ९००)अंशत: पडझड पक्क्या घरांसाठी – ६ हजार ५०० (५ हजार २००).अंशत: पडझड कच्च्या घरांसाठी – ४ हजार रुपये (३ हजार २००).झोपडीसाठी – ८ हजार रुपये (४ हजार १००).

मृत दुधाळ जनावरांसाठी – ३७ हजार ५०० ( ३० हजार), ओढकाम जनावरांसाठी – ३२ हजार रुपये (२५ हजार). वासरू, गाढव, खेचर आदीसाठी – २० हजार रुपये (१६ हजार रुपये). मेंढी, बकरी, डुक्कर यासाठी – ४ हजार रुपये (३ हजार). कुक्कूट पालन – १०० रुपये प्रति कोंबडी, दहा हजार रुपयांपर्यंत (५० रुपये प्रति कोंबडी, ५ हजार रुपयांपर्यंत).

शेती जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – ८ हजार ५०० रुपये, २ हेक्टर मर्यादेत (६ हजार ८००). आश्वासित सिंचनाखालील पिकांसाठी – १७ हजार रुपये प्रति हेक्टरी (१३ हजार ५००). बहुवार्षिक पिकांसाठी – २२ हजार ५०० रुपये (१८ हजार).

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

शेतजमीनीच्या नुकसानीसाठी – १८ हजार रुपये प्रति हेक्टरी (१२ हजार २०० रुपये). दरड कोसळून किंवा जमीन खरडून झालेल्या नुकसानीसाठी – ४७ हजार रुपये, प्रति हेक्टरी. (३७ हजार ५००)

मत्स्य व्यवसाय – बोटींच्या अंशतः दुरूस्तीसाठी – ६ हजार रुपये (४ हजार १००). अंशतः बाधित जाळ्यांच्या दुरूस्तीसाठी – ३ हजार रुपये ( २ हजार १००). पूर्णतः नष्ट बोटीकरिता – १५ हजार रुपये (९ हजार ६००). पूर्णतः नष्ट जाळ्यांसाठी – ४ हजार रुपये (२ हजार ६०० रुपये).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा