30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरराजकारणमोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन

मोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन

Related

भारतात आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार असल्याचा मोठा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी (१५ नोव्हेंबर) यासंदर्भातली माहिती दिली. त्यामुळे आता ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे त्या रुग्णालयांना सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे.

नवीन नियमावलीनुसार अवयवदानासाठी शवविच्छेदन प्राधान्याने केले जावे आणि नियमितपणे शवविच्छेदन करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येईल. तसेच रात्रीच्या वेळीही शवविच्छेदनाचे व्हिडीओ रेकोर्डिंग केले जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या या कौतुकास्पद निर्णयाचे सर्वच स्तरावर कौतुक होत असून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विट करत मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. ‘आता सूर्यास्तानंतरही हॉस्पिटल्सना शवविच्छेदन करता येणार आहे. केंद्र सरकारने तशी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना आता ताटकळत बसावे लागणार नाही. सर्व सामान्यांच्या सुविधेसाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मोदी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन,’ असे ट्विट भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

हे ही वाचा:

शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील

काय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?

… म्हणून आजचा दिवस मोदींसाठी भावनिक

ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय

सूर्यास्तानंतर शवविच्छेदनाला परवानगी दिली असली तरी काही प्रकरणे याला अपवाद असणार आहेत. त्याची स्पष्टताही केंद्र सरकारने दिली आहे. निकालानुसार, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असल्याशिवाय खून, आत्महत्या, बलात्कार, विकृत मृतदेह या श्रेणींमध्ये रात्रीच्या वेळी शवविच्छेदन केले जाणार नाही, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,511अनुयायीअनुकरण करा
4,870सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा