29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारण'आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, मात्र काही ठिकाणी षडयंत्र केले जाते'

‘आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, मात्र काही ठिकाणी षडयंत्र केले जाते’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली

Google News Follow

Related

श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’ कायद्याची मागणी महाराष्ट्रात होतं आहे. याचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्येसुद्धा दिसून आले. यासंदर्भात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधिमंडळात ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला. लव्ह जिहादबद्दल विचार करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अतुल भातखळकर यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, श्रद्धा वालकर हत्याकांडासारख्या अनेक घटना महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत समोर आल्या आहेत. यासर्व प्रकरणामुळे लव्ह जिहादला विरोध करणारा एखादा कायदा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला.

तसेच श्रद्धा वालकरने २०२० मध्ये तक्रार अर्ज केल्यानंतरही पोलिसांनी त्यावर कार्यवाही न करण्यामागे तत्कालीन सरकारच्या शीर्षस्थ नेत्यांचा राजकीय दबाव होता का? असाही सवाल भातखळकरांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले, आत्तापर्यंतच्या तपासात या प्रकरणात कोणत्या राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. मात्र, तिने तक्रार परत का घेतली? याची चौकशी आपण करत आहोत. त्याचसोबत तिने तक्रार करणं आणि ती परत घेणं यात एका महिन्याचा कालावधी गेला. २३ तारखेला तिने तक्रार केली आणि पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला तक्रार परत घेतली. यादरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? तेव्हा जर तपास केला असता, तर हा प्रकार टाळता आला असता. त्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आपण याची माहिती घेत आहोत की इतके दिवस त्यांनी कारवाई का केली नाही?, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

रोहित पवारांना “नो एण्ट्री”

लोकायुक्त कायद्याचे शस्त्र विरोधकांना पेलवेल काय?

अर्जेंटिनाच्या विजयावर अतिउत्साही चाहत्याचा हवेत गोळीबार, एकजण ठार

फडणवीसांचा सवाल, तुम्हाला मंत्रिपद पाहिजे का?

अशा प्रकारची एखाद्या महिलेची तक्रार आल्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ४० मोठे मोर्चे निघाले. यात लव्ह जिहादबाबत कठोर कायदा करण्यात यावा. आंतरधर्मीय विवाहाला सरकारचा कोणताही विरोध नाही. मात्र, गेल्या काही काळात जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये असे विवाह केले जात आहेत. अशा घटना मोठ्या प्रमाणावर बाहेर येताना दिसत आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा