28 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरराजकारणशिंदेंच्या प्रकल्पांना स्थगिती दिल्याच्या बातम्या येतात, पण स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे...

शिंदेंच्या प्रकल्पांना स्थगिती दिल्याच्या बातम्या येतात, पण स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर साधला निशाणा

Google News Follow

Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांच्या अभिभाषणावर मत मांडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विकासकामांवर भाष्य करत असतानाचं विरोधकांवर खोचक टीका करत मिश्कील टिपण्णीही केली. माध्यमांमधील बातम्यांवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत खोचक टिपण्णी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सातत्याने येत असताना यावर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचं भाष्य करत माध्यमांसह विरोधकांचे कान टोचले आहेत. देवेंद्र फडणवीस सभागृहात यावर बोलताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकल्पाला स्थगिती दिल्याचा बातम्या सातत्याने येत आहेत. माध्यमांसाठी ही बातमी आवडती झाली आहे. लक्षात ठेवा स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले की, जे राज्याच्या हिताचे आहे ते सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी आणि अजित पवार होतो. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत त्यांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंची नसून आम्हा तिघांची आहे. प्रशासनात खालच्या स्तरावर गडबड होते. खालच्या स्तरावर चर्चा करुनच काही निर्णयांना स्थगिती देण्यात येते. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी फडणवीसांचा दणका असं माध्यमांमध्ये म्हटलं जातं. एखाद्या खात्याच्या मंत्र्यांने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्थगिती दिली तरी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या कामाला स्थगिती दिली असं म्हटलं जातं. अजित पवार थेट बोलतात म्हणून त्यांच्या वाटेला कोणी जात नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांमधील या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, महायुती सरकारमध्ये आम्ही सगळे निर्णय तिघे मिळून घेतो. मंत्रिमंडळाच्या बैठका होतात तेव्हा काही बैठकांना अजित पवार असतात तर काही बैठकांना एकनाथ शिंदे उपस्थित असतात. काही बैठकांना दोघेही असतात. पण, जो आला नाही तो नाराज असं माध्यमांमध्ये म्हटलं जातं. सध्या माध्यमांना दर्जेदार बातम्या सापडत नाहीयेत आणि विरोधकांना दर्जेदार टीका करता येत नाहीये, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसह विरोधकांना लगावला आहे.

काँग्रेसकडून नाना पटोलेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे का?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातून राज्याची दिशा मांडली आहे. राज्यपालांनी राज्याच्या विकासावर मार्गदर्शन केलं. पण राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत काँग्रेस नेते नाना पटोले सहभागी नव्हते. काँग्रेसने नाना पटोले यांचं नाव येथेही कापलं का? की नाना पटोले यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे? नाना पटोले हे विदर्भाचा बुलंद आवाज आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नानाभाऊ रंगबेरंगी कपडे घालून येत होते. त्यामुळे मला वाटलं की नाना हे दुसऱ्या माहोलमध्ये आहेत. पण आज ते पुन्हा पांढरे कपडे घालून आलेत,” अशी मिश्कील टीका देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर केली.

हे ही वाचा:

परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणतात, पीओके घेण्यापासून कोण रोखत आहे?

महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात

कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार

छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला; अनिल परबांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध

छत्रपतींच्या वारसदारांकडून दाखला मागणाऱ्यांतले आम्ही नाही

सध्या राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरही भाष्य केलं. महायुतीवर राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखवला असून सरकार चांगलं काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे दैवत असून गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कामांना सुरुवात केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कधीही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागतिले नाहीत. छत्रपतींचे वारस आहात याचा दाखला मागणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सर्वजण आहोत असं मानणारे आम्ही आहोत, असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा