भारतीय राष्ट्र समिती (BRS)चे नेते व पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर फुटल्यानंतर त्यांच्या कन्या कविता यांनी पक्षातील नेतृत्वावर आणि अंतर्गत लोकांवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना कविता यांनी हे पत्र कसे फुटले याचा स्रोत काय असा सवाल केला. तसेच त्यांनी आरोप केला की BRS पक्ष आतूनच कमजोर केला जात आहे आणि त्याला भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कविता म्हणाल्या, “मी शेकडो पत्रं लिहिली आहेत. पत्र लिहिण्यात चूक काय आहे? मला माहिती हवी की हे पत्र लीक कोणी केलं. दोषी सापडत नाहीत, पण माझ्यावर ताकद दाखवत आहात.”
कविता यांचे आरोप
“केसीआरच्या वतीने लोक माझ्याकडे खोटी माहिती घेऊन आले. मी खूप दुखावले गेले,” असं त्या म्हणाल्या. BRS–BJP विलीनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेत कविता म्हणाल्या, “मी जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा मला BJP विलीनीकरणाचा प्रस्ताव आला. मी त्यावेळीही विरोध केला होता, आणि आत्ताही करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “चंद्राबाबूंच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे. मी स्पष्टपणे सांगितलं आहे – BRS भाजपात विलीन होऊ नये. मी एक वर्ष जेलमध्ये जायला तयार आहे, पण हे होऊ देणार नाही.”
निवडणूक पराभवाबाबत आरोप करत, कविता म्हणाल्या, “BRS एवढा कमजोर का झाला? कोणते असे लोक पक्षात आहेत? भाजपचे लोक आहेत का?”
हे ही वाचा:
सनातन धर्मात महिलांना आदर मिळतो, म्हणून निदा खानने सोडला इस्लाम!
अमेरिकेतील ‘सांबा’ शिळेवरून उतरला..
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पाटणा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन
अभ्यासाच्या ताणातून कर्नाटकातील विद्यार्थिनीने गमावला जीव
त्या म्हणाल्या, “भाजप नेत्यांच्या हॉस्पिटल्सचे उद्घाटन कोणी केलं? पक्षातील दलबदलूंनी मला निवडणुकीत हरवलं. पक्षनेतृत्वाने आता नियंत्रण घेतलं पाहिजे. KCR यांना वाचवा. पक्षातील गुप्त वेशात असलेल्यांवर नियंत्रण ठेवा.”
माध्यमांवरही ताशेरे:
“माझ्याबद्दल काही पेड कलाकार आणि सोशल मीडियावर लोक बोलत आहेत. पक्षाची मुलगी लक्ष्य केली जात आहे, पण पक्ष मौन आहे. मी बोलायला लागले, तर चांगलं होणार नाही,” असं त्यांनी इशारा दिला.
भविष्यात नव्या पक्षाचा विचार
“माझ्या विरोधात कटकारस्थान रचले जात आहे. मी फक्त KCR यांच्या नेतृत्वातच काम करेन. नव्या पक्षाबाबत विचारले असता, कविता म्हणाल्या, ‘का नाही? भविष्यात काय होईल, कोण जाणे?’”







