28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणकसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक मतदानास सुरवात

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक मतदानास सुरवात

मागील मतदानाच्या तुलनेत चांगले मतदान होण्याची आशा

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक आणि  लक्ष्मण   जगताप यांच्या निधनामुळे कसबा आणि चिंचवड मध्ये पोटनिवडणूक घेण्याची गरज होती. पुणे जिल्ह्यातल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरवात झाली आहे.  कसबा पेठ हा अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो विद्यमान लोकसभा खासदार गिरीश बापट हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले आहेत.  कसबा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना  उबाठा या महाविकास आघाडीचे समर्थक काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरात लढत होत आहे.

चिंचवड हे पुणे शहराजवळील औद्योगिक शहर आहे. चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात लढत होत आहे. चिंचवड मतदारसंघात एकूण ५,६८,९५४ नोंदणीकृत मतदार असून कसबा मतदारसंघात २,७५,४२८ नोंदणीकृत मतदार आहेत. माविआ, शिवसेना आणि भाजप या पक्षांसाठी हि प्रतिष्ठेची लढत असणार आहे. कसबा पेठेत सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासांत सहा पूर्णांक पाच टक्के मतदान झाले असून , चिंचवड मध्ये तीन पूर्णांक ५२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून वेब कास्टिंग द्वारे ३९० मतदान केंद्रावरील मतदानाच्या प्रक्रियेवरती थेट लक्ष ठेवले जात आहे.

हे ही वाचा:

मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये म्हणून , निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी , एकूणच निवडणूक केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्र ओळखली जातात. यासाठी वेब कास्टिंग केल्याचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी येथे सांगितले आहे.  खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी थेरगाव इथल्या संचेती विद्यालयात सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला. महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना पोषक वातावरण आहे. त्या निवडून येतीलच असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. हि तिरंगी लढत नसून दुरंगी लढत असल्याचे ते यावेळेस म्हणले. जेव्हा निकाल बाहेर येईल तेव्हा हि दुरंगी लढत होती ते  कळेल अश्विनी जगतापच  विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा