हिंदी भाषा सक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधी नेते आमने सामने आहेत. हिंदी भाषा सक्तीची नसून ती ऐच्छिक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, यावरून विरोधक राजकारण करत असल्याचे सत्ताधारी नेते बोलत आहेत. हिंदी भाषेविरुद्ध मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या ५ जुलैला मराठी माणसांचा भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे.
यावेळी दोनही ठाकरे एकत्रित दिसणार आहेत. याच दरम्यान, उबाठा नेते अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगांवकर यांची एकत्रित एबीपी माझावर मुलखात पार पडली. यावेळी अनिल परब भाजपाला आवाहन करताना दिसले. त्यांनी ट्वीट देखील केले आहे. दरम्यान, अनिल परबांच्या आवाहनाला भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत टोला देखील लगावला आहे.
माझा कट्टावर आलेले अनिल परब म्हणाले, आज भारतीय जनता पक्ष सर्वात ताकतीचा पक्ष आहे. पण आम्ही दोघे मिळून जो मोर्चा काढू तो भाजपाने काढून दाखवावा. भाजपा नंबर एकचा पक्ष आहे ना?, मग लोकांच्या मनात काय आहे ते महत्वाचे आहे.
हे ही वाचा :
उत्तराखंड: यमुनोत्री महामार्गावर ढगफूटी, ८ ते ९ कामगार बेपत्ता
बांगलादेशातील हिंदू महिलेवरील बलात्काराने जगभरात संताप!
भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी, ३ जणांचा मृत्यू!
बिहार बनले देशातील पहिले राज्य जिथे मोबाईलद्वारे मतदान
अनिल परबांच्या या आवाहनाला उत्तर देत अतुल भातखळकर म्हणाले, एकट्याच्या जीवावर काही करण्याची ताकद उरलेली नाहीये, पक्षाचे पार पोतेरे झालेले आहे. त्यामुळे कधी काँग्रेसच्या जीवावर, कधी राष्ट्रवादीच्या जीवावर, कधी कुणाच्या जीवावर… उड्या मारण्याचे प्रकार सुरू आहेत. पक्षप्रमुख विधानसभा निवडणुकीच्या काळात चिता कॅम्पमध्ये हिंदीत भाषण ठोकून आले होते. फार जुनी गोष्ट नाही आहे, आठवून पहा जरा.
एकट्याच्या जीवावर काही करण्याची ताकद उरलेली नाहीये, पक्षाचे पार पोतेरे झालेले आहे. त्यामुळे कधी काँग्रेसच्या जीवावर, कधी राष्ट्रवादीच्या जीवावर, कधी कुणाच्या जीवावर… उड्या मारण्याचे प्रकार सुरू आहेत.
पक्षप्रमुख विधानसभा निवडणुकीच्या काळात चिता कॅम्पमध्ये हिंदीत भाषण ठोकून आले… https://t.co/iZl7NAjZU9— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2025
