राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे मराठा आंदोलनाला हिंसक वळण येत असून अनेक नेते, आमदार, खासदार आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. शिवसेनेच्या दोन खासदारांनी सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शिवसेनेचे वैजापूर- गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी मंगळावर, ३१ ऑक्टोबर रोजी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे शिंदे या दोन खासदारांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडालेली असताना विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.
“राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज हे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आणि आंदोलन करत आहेत. मराठा समाजाच्या या संबंधी अंत्यत तीव्र भावना असून मराठा समाजाच्या या रास्त मागणीसाठी मराठा समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असून मी माझ्या विधानसभा सदस्य या पदाचा राजीनामा स्वखुशीने देत आहे,” असे बोरणारे यांनी पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा..
मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा
उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे
लिओनेल मेस्सी आठव्यांदा ठरला ‘बॅलन डी’ओर’ चा मानकरी
मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे निर्देश
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून सोमवारी अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ केली. कार्यालयेही जाळण्यात आली आहेत. हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.