ऑपरेशन सिंदूरवरील वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शर्मिष्ठा पानोली या २२ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीच्या अटकेने देशभरात प्रचंड खळबळ उडवली आहे. तिला ३० मे रोजी गुरुग्रामहून अटक करून १४ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
यासंदर्भात आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि खासदार कंगना रनौट यांनी ममता बॅनर्जी सरकारवर सडकून टीका केली आहे. पवन कल्याण यांनी सवाल उपस्थित केला आहे की, “सनातन धर्माचा अपमान चालतो?” “टीएमसी खासदार जेव्हा सनातन धर्माचा अपमान करतात, तेव्हा कुठं आहे तात्काळ अटक? कुठं आहे दिलगिरी? फक्त एका हिंदू तरुणीवर कारवाई? सेक्युलरिझम म्हणजे सर्वांना सारखाच न्याय हवा. धर्माचा अपमान करेल त्या प्रत्येकावर कारवाई हवी पण ती फक्त सोयीस्कर नको.
पवन कल्याण यांनी म्हटले आहे की, जेव्हा निवडून आलेले टीएमसीचे नेते, खासदार सनातन धर्माची चेष्टा करतात, तेव्हा कोट्यवधी लोकांच्या मनावर होणाऱ्या खोल, जळजळीत वेदनांचं काय? जेव्हा आमच्या श्रद्धेला ‘गंदा धर्म’ म्हणत अपमान केला जातो, तेव्हा संताप कुठे असतो? कुठे आहे त्यांची माफी? कुठे आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई?
धर्मनिंदा ही कोणतीही असो — ती निंदनीयच असते! धर्मनिरपेक्षता ही काही एका बाजूस ढाल, तर दुसऱ्याला शस्त्र ठरू नये. ती दोन्ही बाजूंना समान न्याय देणारी असली पाहिजे. पश्चिम बंगाल पोलीसांनो, संपूर्ण देश तुमच्याकडे पाहतो आहे. सगळ्यांसाठी न्यायपूर्ण कृती करा!, असेही पवन कल्याण यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
राऊत यांच्यासारखा वेडा इसम काय बोलतो याकडे कशाला लक्ष द्यायचे?
ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा कहर, २५ जणांचा मृत्यू!
चौथ्या आर्थिक तिमाहीवर ‘महाकुंभ कृपा’?
बलुच लढवय्यांचा पाकिस्तानमधील सूरब शहरावर ताबा?
भाजप खासदार व अभिनेत्री कंगना रनौट म्हणाल्या की, “हो, तिने कठोर शब्द वापरले, पण आजकाल तरुण सर्रास असेच बोलतात. तिने माफी मागितली आहे, एवढे पुरेसे आहे. तिला त्रास देणे थांबवा आणि तिला लगेच सोडून द्या. “पश्चिम बंगालला उत्तर कोरियात रूपांतरित करू नका. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.”
शर्मिष्ठाने भारताच्या पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील हल्ल्यांवर (Operation Sindoor) मौन बाळगणाऱ्या काही बॉलिवूड कलाकारांवर टीका करताना काही अवमानकारक, कठोर व राजकीयदृष्ट्या संवेदनशील शब्द वापरल्याचा आरोप आहे. या व्हिडिओवर मोठा विरोध झाला, त्यामुळे तिने पोस्ट हटवली आणि माफीनामा सुद्धा दिला.
तथापि, एकाहून अधिक एफआयआर दाखल झाल्याने तिला कोलकाता पोलिसांनी अटक केली.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “ही बाब केवळ बंगालपुरती नाही, ही बाब एका तरुण हिंदू मुलीला लक्ष्य केल्याची आहे. आणि हे फक्त एका विशिष्ट मतदारवर्गाला खूश करण्यासाठी केलं जातं आहे.
कोलकाता पोलिसांनी सांगितले की, शर्मिष्ठा पानोलीला अनेक कायदेशीर नोटीसा दिल्या होत्या, पण ती अटक टाळत होती. अखेरीस तिला ३० मे रोजी गुरुग्राममधून अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
