30 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणमोदी जीवन सुसह्य करताहेत आणि काँग्रेस मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहात आहे...

मोदी जीवन सुसह्य करताहेत आणि काँग्रेस मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहात आहे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकातील मंड्या आणि हुबळी-धारवाड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी मोदींनी काँग्रेसची उडविली खिल्ली

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी  मंड्या आणि हुबळी-धारवाड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.काँग्रेस-जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या मंड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी तेरी कबर खुदेगी’ ही घोषणा देण्यावरून  काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  ‘काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण मोदी एक्स्प्रेस वे बांधण्यात मग्न आहेत. मोदी गरिबांचे जीवन सुसह्य करण्यात व्यस्त आहेत. देशातील कोट्यवधी माता-भगिनींचे आशीर्वाद हे मोदींचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे, हे काँग्रेसला माहीत नाही अशी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.

पंतप्रधान कर्नाटकातील मंड्या येथे पोहोचताच रोड शो दरम्यान त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग राष्ट्राला समर्पित केला. हुबळी धारवाडमध्येही विविध प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.  मंड्यातील बेंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गाच्या उद्घाटन समारंभात जाहीर सभेला मार्गदर्शन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, शिलान्यासापासून ते उद्घाटनापर्यंत, दुहेरी इंजिन सरकार अतिशय वेगाने काम करते. ज्या पायाभरणीचे आपण उद्घाटन करू, त्याचे उद्घाटनही आपणच करू, असा माझा संकल्प आहे.

‘२०१४ पूर्वी केंद्रातील काँग्रेस सरकारने गरीब जनतेला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. काँग्रेस सरकारने गरिबांचा पैसा लुटला आहे. काँग्रेसच्या राजवटीत गरिबांना फायद्यासाठी घरोघरी भटकावे लागत होते, पण भाजप सरकारमध्ये लाभ त्यांच्या दारापर्यंत पोहोचतात अशी जोरदार टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

हे ही वाचा:

दाऊदचा मुलगा दुबईत पार्टीला आला होता?

राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार

जेष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन

देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांसाठी खूप काम केले जात आहे, कर्नाटक बदलत आहे आणि भारत बदलत आहे.पायाभूत सुविधा केवळ सुविधाच देत नाहीत, तर त्यासोबत रोजगार, गुंतवणूक आणि कमाईचे साधनही येते. २०२२ मध्ये भारतात विक्रमी गुंतवणूक झाली. त्याचा सर्वाधिक फायदा कर्नाटकला झाला आहे . कोविड महामारी असूनही कर्नाटकात ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा