32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरराजकारणबारसूत लोकभावनेबद्दल बोलणाऱ्यांनी महापौरांचा बंगला कसा ढापला?

बारसूत लोकभावनेबद्दल बोलणाऱ्यांनी महापौरांचा बंगला कसा ढापला?

रत्नागिरीत ठाकरेंची 'राज'गर्जना

Google News Follow

Related

कोकणात अजूनही तेच तेच मुद्दे उगाळले जात आहेत. आज राज ठाकरे बोलले पण उद्या त्याच काही नाही. कोकणासारखा भाग ज्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, अशा भागात वाद सुरू आहेत. नाणार आणि बारसूवरून वाद सुरू आहेत. पण, बारसू अचानक आलं कुठून? कोकणातील लोकांना कळत नाही त्यांच्या जमिनी विकल्या जात आहेत. तुमचे लोकप्रतिनिधी तुमच्याकडून जमिनी घेऊन नंतर सरकारकडून हजार पट रक्कम घेतात, हे तुम्हाला कळत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. राज ठाकरे रत्नागिरीत या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आले होते. त्यांनी बारसूसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

कोकणातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कोकणात प्रश्न उभे राहण्याची कारणं म्हणजे कोकणी माणूस स्वतः आहे. त्याच- त्याच पक्षाला निवडून देऊन त्या पक्षांनी कोकणाचा व्यापार करून ठेवला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज बारसूमध्ये येऊन गेले. आता म्हणत आहेत लोकांची भावना तीच आमची भावना. मग, बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत महापौर बंगला काय लोकांना विचारून ढापला का? असा संतप्त सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आपलं कोकण वाचावा हेच सांगण्यासाठी इथे आलो आहे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार मिळालेले अनेक चेहरे कोकणातील आहेत. इतका प्रतिभावंत असलेला हा कोकण आणि आज या कोकणाला लुटलं जात आहे. तुमच्या पायाखालची एकदा जमीन गेली की मग तुम्ही कोण आहात? असा प्रश्न उपस्थित होणार. इतिहासातही प्रत्येकाने जमीन ताब्यात घेतली आणि वर्चस्व मिळवलं. इतिहास भूगोलाशिवाय अपूर्ण आहे. जमीन तुम्ही अमराठी व्यापाऱ्यांना विकत आहात. कोणासाठी जमीन देत आहात याच भान तुम्हाला नाही. जैतापूरलाही जमिनी कोणाला दिल्या हेच माहीत नव्हतं. नाणारलाही तेच आणि बारसूलाही तेच सुरू आहे. सर्व प्रकरण पाहून प्रचंड संताप झाला म्हणून मला येऊन बोलायचं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

आज ज्या गोष्टी कोकणाकडे आहेत त्याच्यावर आज केरळ सारखं राज्य सुरू आहे. पर्यटनावर ते राज्य सुरू आहे. प्रकल्प तिकडे जात नाहीत. आपल्याकडे सह्याद्रीच्या रांगा आहेत, त्यावर महाराजांचे किल्ले आहेत ते आपल्याला नीट ठेवता येत नाहीत, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

प्रत्येकाला महाराष्ट्राबद्दल आपुलकी असायला हवी. आपला एकटा कोकण पर्यटन क्षेत्रातून अख्ख्या राज्याला पोसू शकतो. सरकारच याकडे लक्ष नाही. महाराष्ट्राला आणि महापुरुषांना राजकीय स्वार्थासाठी प्रदेशांमध्ये आणि जातींमध्ये वाटून ठेवलं आहे. जनतेने त्यात गुंतून राहावं हेच हवं आहे राजकारण्यांना. तुमच्या आधी राजकारण्यांना माहित असतं कुठला प्रकल्प कुठे येणार आहे. त्यानुसार व्यवहार केले जातात. लोकांनी जाग राहण्याची गरज आहे.

बारसूमध्ये ऐतिहासिक कातळशिल्प आहेत. युनेस्कोच्या यादीत याचा समावेश होणार आहे. त्यानंतर नियमानुसार अशा ऐतिहासिक गोष्टींच्या आजूबाजूला काहीही करता येत नाही. पण, कोकणी लोक जमिनी विकून बसले आहेत कारणं युनेस्को काय आहे हेच माहीत नसत, असं म्हणत राज ठाकरे यांनी कातळशिल्पाचे फोटोही दाखवले.

हे ही वाचा:

यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !

‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!

सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती

२००७ साली मुंबई- गोवा मार्गाचे काम सुरू झाले पण अजून या रस्त्याचे काम पूर्ण होत नाहीये. कुठे आहेत तुमचे आमदार आणि खासदार? त्यांनाही आता माहीत आहे काम केलं काय किंवा नाही केलं लोक निवडून देणार. आता १६ वर्षे झाली अजून हा रस्ता मार्गी लावलेला नाही. नितीन गडकरी म्हणतात कंत्राटदार पळून गेले. पण, लोकांनी विचारलं का असे कसे पळून गेले? लोकप्रतिनिधींना फक्त मतांशी घेणंदेणं आहे. दुसरीकडे समृद्धी महामार्ग बघा. चार वर्षात नव्याने उभारून लोकांच्या सेवेत आला. कोकणात १६ वर्षे रस्ता पूर्ण होत नाहीये आणि याच कारण म्हणजे तुम्हाला गृहीत धरलं जात आहे, अशी सणसणीत टीका करत राज ठाकरेंनी मुंबई- गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर प्रकाश टाकला.

शरद पवारांच्या राजीनामानाट्यावरही ते बोलले. हल्लीची महाराष्ट्राची राजकीय परिस्थती समजतच नाही. दोन दिवसांपासून सुरू असलेलं राजीनामा नाट्य अखेर संपलं. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचे वागणे पाहून शरद पवारांच्या मनात आलं असणार आताच राजीनामा दिला आहे आणि हा असं वागत आहे. काही दिवसांनी खरंच राजीनामा दिला तर हा मलाही बोलेल गप्प बसा. अक्षरशः अजित पवारांना उकळ्या फुटत होत्या, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी अजित पवारांवर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा