महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा अर्ज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नात्याने दाखल करण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याची चर्चा सुरू झाली असून, उद्धव ठाकरे यांना हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी सोमवारी (२९ जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांचं धक्का बसला आहे.
सचिन अहिर हे ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी वरळी परिसरात पक्ष संघटन मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख होती. २०२२ मध्ये त्यांना शिवसेनेने विधान परिषदेवर पाठवले होते. त्यानंतर ते पक्षाचे उपनेते म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हे ही वाचा:
प्रचंड लाटा, जोरदार वाऱ्यांच्या तडाख्यात अडकली बोट, ६ मच्छिमार वाचले
पाकिस्तानला FATFच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आणण्यासाठी भारत सज्ज
“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा
जून महिन्यात मंदावलेला मान्सून वेग धरणार; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
विधान परिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सचिन अहिर यांच्या विजयाची शक्यता प्रबळ मानली जात आहे. अशा परिस्थितीत त्यांची निवड झाल्यास ती केवळ एका पदाची निवड ठरणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एका मोठ्या पक्षांतराची नोंद म्हणूनही पाहिली जाईल.







