भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहला जिथं परिस्थिती सर्वात कठीण आहे, तिथं खेळवावं, असा सल्ला भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी दिला आहे. त्यांनी सांगितलं की, अशा खेळीने पाहुण्या भारतीय संघाला यजमान इंग्लंडवर निर्णायक वर्चस्व गाठता येईल.
या दौऱ्यात बुमराह त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सर्व पाच कसोट्या खेळणार नाही. जानेवारीत सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाचव्या कसोटीत त्याच्या पाठीला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो जवळपास चार महिने मैदानाबाहेर होता.
चोप्रा म्हणाले,
“कठीण परिस्थितीत तुमचे सर्वोत्तम खेळाडूच कामी येतात. विराट कोहलीला तुम्ही अशाच वेळी हवं असतं. आणि जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज तर नक्कीच हवा असतो. ओव्हल आणि बर्मिंघमसारख्या ठिकाणी खेळणं कठीण आहे. तिथे पिचेस सपाट असतात आणि अनुभवी गोलंदाजांची गरज असते. जर निर्णय माझ्यावर असता, तर मी बुमराहला तिथेच उतरवलं असतं जिथं आव्हान सगळ्यात मोठं आहे.”
प्लेइंग इलेव्हनबाबत अनिश्चितता
चोप्रा यांना असंही वाटतं की, भारताच्या प्लेइंग इलेव्हनबाबत अजूनही स्पष्टता नाही. कप्तान शुभमन गिल आणि कोच गौतम गंभीर यांनीही कबूल केलं आहे की, अंतिम निर्णय पहिल्या कसोटीपूर्वीच घेतला जाईल.
“सध्या संघात अनिश्चिततेचं वातावरण आहे. जर प्लेइंग इलेव्हन ठरलेली असती, तर सर्वश्रेष्ठ खेळाडूंना पाठिंबा दिला असता. पण सध्या टॉप ऑर्डरमधील क्रमवारीच निश्चित नाही. नंबर-३ आणि नंबर-४ अजून ठरलेले नाहीत. मला शुभमन गिल नंबर-4 वर योग्य वाटत नाही.”
हेही वाचा :
चीनला वठणीवर आणणाऱ्या प्रकल्पांना काँग्रेसचा विरोध काय सांगतो???
नूर खान एअरबेसवर अमेरिकेचे नियंत्रण…पाक सुरक्षा तज्ज्ञाच्या दाव्यामुळे खळबळ
आयफेल टॉवरपेक्षाही उंच चिनाब पूल झाला खुला!
छत्तीसगढ: १ कोटीचं बक्षीस असलेला नक्षली सुधाकर ठार!
करुण नायर व नीतीश रेड्डीवर विश्वास
“साईड गेम्समधून बरेच प्रश्न सुटतील. करुण नायरने पहिल्या साईड मॅचमध्ये नंबर-३ वर चांगली खेळी केली, पण त्याच्यासाठी नंबर-६ योग्य वाटतो. माझं मत आहे की, नीतीश रेड्डी प्लेइंग इलेव्हनमध्ये हवा. रवींद्र जडेजा स्पिन विभागाचा प्रमुख असेल, पण मी बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये तडजोड करणार नाही.”
चोप्राची आदर्श भारतीय प्लेइंग इलेव्हन
-
यशस्वी जयसवाल
-
केएल राहुल
-
साई सुदर्शन
-
शुभमन गिल (नंबर-४)
-
ऋषभ पंत (विकेटकीपर)
-
नीतीश कुमार रेड्डी (नंबर-६)
-
रवींद्र जडेजा
-
शार्दुल ठाकूर
-
जसप्रीत बुमराह
-
मोहम्मद सिराज
-
प्रसिद्ध कृष्णा
“शार्दुल ठाकूर हा एक असा गोलंदाज आहे जो चांगली बॅटिंग करतो, त्यामुळे तो एक बॉलिंग ऑलराउंडर आहे. आणि अशा बॅलन्समुळे आपण पाच फ्रंटलाइन बॉलर्स खेळवू शकतो, जे कसोटी सामन्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.”
