व्हीएतनामच्या दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूअ मॅक्रोन यांचा एक व्हीडीयो व्हायरल झाला आहे. मॅक्रान यांचे विमान व्हीएतनामच्या हनोई विमानतळावर उतरले. विमानाचे गेट खुलताच त्यांची पत्नी ब्रिजिट हीने मॅक्रान यांच्या मुस्कटात लगावत असल्याचे दृष्य स्वागताला उपस्थित असलेल्या लोकांनी पाहीले. स्वत:ला सावरून मॅक्रॉन सपत्नीक विमानाच्या शिडीवरून उतरले. पश्चिमी सभ्यतेनुसार परदेश दौऱ्यावर आलेले जोडपे, हातात हात घालून उतरते. तसा काही प्रकार दिसला नाही. दोघांचे चेहरे कोरे होते. जे काही लोकांना पाहीले तो पत्नीचा लडीवाळपणा होती की ब्रिजिट यांनी खरोखरच त्यांना लाफा मारला होता, याबाबत आता चर्चा सुरू आहे. काहीही असो परंतु या निमित्ताने युगोनुयुगे दडपलेले एक सत्य ठसठशीतपणे जगासमोर आलेले आहे.
