महाराष्ट्रातील महायुती सरकारने पहील्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये मिळून अर्धा डझन पेक्षा जास्त एसआयटी (विशेष तपास गट) स्थापन केलेल्या आहेत. षडयंत्रांचा माग काढण्यासाठी, भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी, अशा विविध कारणांसाठी वेळोवेळी महायुती सरकारने या एसआयटीची घोषणा केली. काही एसआयटीची घोषणा तर २०२३ मध्ये कऱण्यात आलेली आहे. परंतु जुन्या नव्या एसआयटीने एखादा मामला खणून काढला, काही दिवे लावले असे काही ऐकीवात नाही.