32 C
Mumbai
Sunday, February 9, 2025
घरविशेषराष्ट्रपतींचा अपमान ही विकृत मानसिकता!

राष्ट्रपतींचा अपमान ही विकृत मानसिकता!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केला प्रहार

Google News Follow

Related

विरोधक सध्या इतके निराश आणि हताश आहेत की, त्यांनी थेट राष्ट्रपतींना लक्ष्य केले. हे विकृत मानसिकतेचे उदाहरण आहे, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांवर प्रहार केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर मोदींनी ही टीका केली.

मोदी म्हणाले की, एक महिला राष्ट्रपती, गरीब परिवारातून आलेली स्त्री त्यांचा सन्मान केला गेला नाही. विरोधकांची निराशा समजू शकतो. पण राष्ट्रपतींच्या विरोधात असे ते का बोलले ?

मोदींनी राहुल गांधी आणि परिवारावरही शरसंधान केले. ते म्हणाले की, एकाच वेळेला संसदेत एकाच परिवाराचे तीन सदस्य कधी झाले आहेत का? एकाच कालखंडात संसदेत एसटी वर्गातील एकाच परिवारातील खासदार कधी झालेत का, इथे उक्ती आणि कृती यातील फरक दिसून येतो. आम्ही जे बोलतो तेच करतो. एससी, एसटी समाजाला कसे सशक्त करता येईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न केले.

मोदींनी सांगितले की, मुस्लिम महिलांना त्यांनी कशापद्धतीने संकटात टाकले. आम्ही ट्रिपल तलाक संपुष्टात आणला संविधानाला अनुरूप मुस्लिम बहिणींना समानतेचा अधिकार दिला. जेव्हा देशात एनडीएचे सरकार राहिले आहे तेव्हा तेव्हा आम्ही मागसलेल्यांसाठी काम केले आहे. अटलजी पंतप्रधान होईपर्यंत कुणाला हे समजले नाही. आदिवासींना वेगळे मंत्रालय एनडीएने बनवले. मच्छिमरांसाठी वेगळे मंत्रालय केले. वंचित लोकांमध्ये एक सामर्थ्य असते. कौशल्य विकासाला संधी दिली तर त्याचा फायदा होता. त्यासाठी कौशल्य मंत्रालय केले. मागील ३० वर्षात ओबीसी समाजाचे सदस्य एक होऊन मागणी करत होते की, ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा द्यावा. ज्यांना जाती आरक्षणात मलाई दिसते त्यांना ओबीसी मंत्रालयाची आठवण आली नाही. प्रत्येक क्षेत्रात एससी, एसटी ओबीसीना संधी मिळावी या दिशेने आम्ही मजबुतीने काम केले आहे.

गरिबी हटाओचे नारेच फक्त ऐकले!

मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या या संबोधनाकडे पाहताना हे लक्षात येते की, त्यांनी देशाच्या समोर भविष्याची २५ वर्षे व विकसित भारतासाठी एक नवा विश्वास जागविणारी गोष्ट सांगितली. राष्ट्रपतींचे हे उद्बोधन विकसित भारताच्या संकल्पाला मजबुती देणारे आहे, नवा विश्वास देणारे आहे व जनसामान्यांना प्रेरित करणारे आहे. गेल्या १० वर्षांत देशाच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. २५ कोटी देशवासी गरिबीला मागे टाकून त्यातून बाहेर आले. पाच पाच दशके गरिबी हटाओचे नारे ऐकले, पण आता २५ कोटी गरिबीतून बाहेर आले. हे सहज होत नाही. योजनाबद्ध पद्धतीने, समर्पित भावनेने, आपुलकीने गरिबांसाठी जीवन त्यागले जाते तेव्हा हे होते.

हे ही वाचा:

इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात प्रवेश

मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक

महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या ८ जणांविरुद्ध एफआयआर!

महाराष्ट्रात काळ्या जादूची चर्चा का होतेय?

आम्ही १२ कोटी पेक्षा अधिक शौचालय महिलांची ही समस्या दूर केली. मीडियात आजकाल चर्चा होते , सोशल मीडियात त्यापेक्षा अधिक चर्चा आहे. काही लोकांचे लक्ष स्टायलिश शॉवर, जकुझीवर आहे. पण आमचे लक्ष हर घर जल या योजनेवर आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर १६ कोटी घरांत पाण्याचे नळ नव्हते. आमच्या सरकारने पाच वर्षांत १२ कोटी परिवारांना नळातून पाणी पुरवले आहे. हे काम वेगाने सुरू आहे, असे म्हणत मोदींनी केजरीवाल सरकारलाही लक्ष्य केले.

मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सरकारने गरिबांसाठी केलेल्या कामाचे वर्णन केले आहे. जे लोक गरिबांच्या झोपड्यांत फोटो सेशन करतात आपले मनोरंजन करतात, त्यांना संसदेत गरिबांची गोष्ट बोरिंगच वाटणार. मी त्यांचा राग समजू शकतो. समस्येची ओळख करणे एक गोष्ट आहे. पण जबाबदारी घेतली असेल तर समस्येपासून पळ काढता येत नाही. आमचा प्रयत्न समस्या सोडविण्याकडे असतो. आमच्या देशात एक पंतप्रधान झाले, त्यांना मिस्टर क्लिन म्हटले जात असे. त्यांनी एक समस्या ओळखली. ते म्हणाले की, दिल्लीतून १ रुपया निघाला की गावात १५ पैसे पोहोचतात. तेव्हा पंचायत ते पार्लमेंट एकाच पक्षाचे सरकार होते. त्यावेळी सार्वजनिक स्तरावर म्हटले होते की, १ रुप.या निघाले की १५ पैसे पोहोचतात. ही अजब हातसफाई आहे.

जेव्हा सत्ता सेवा बनते तेव्हा राष्ट्रनिर्माण होते. सत्ता हा वारसा बनवले जाते तेव्हा लोकशाही संपते. आम्ही विषाचे राजकारण करत नाही. सरदार वल्लभभाई पटेलांचा सर्वात मोठा पुतळा आम्ही केला. पण ते भाजपाचे नव्हते, जनसंघाचेही नव्हते.  अर्बन नक्षलची भाषा आज उघडपणे बोलली जात आहे. इंडियन स्टेटसमोर घोषणा करतात. त्यांना देशाच्या एकजुटीचे ज्ञानही नसते, असेही मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा