एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चे महासंचालक जी.व्ही.जी. युगंधर यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अति महत्वाच्या व्यक्तिंना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा नियमितपणे आढावा घेण्यात येतो. गुप्तचर यंत्रणांकडून एखाद्याला जास्त संरक्षण देण्याची गरज असल्याचा अहवाल आल्यास अनेकदा सुरक्षा वाढवण्यात येते. युगंधर यांची सुरक्षा गुप्तचर संस्थांच्या सुचनेवरूनच वाढवण्यात आली आहे. गुजरातमध्ये अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानाबाबत सुरू असलेल्या तपासाचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे हा निर्णय अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे.
