27.4 C
Mumbai
Sunday, July 13, 2025
घरविशेषरवींद्र चव्हाण म्हणाले, 'सर्वसामान्य कुटूंबातला व्यक्ती राज्यातील पक्षाचा प्रमुख झाला!

रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘सर्वसामान्य कुटूंबातला व्यक्ती राज्यातील पक्षाचा प्रमुख झाला!

भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड

Google News Follow

Related

महाराष्ट्रात प्रदेश भाजप अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपची जबाबदारी कोण घेणार याची सर्वांना उत्सुकता होती, पण आता ते स्पष्ट झाले आहे. रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदावर आधीच होते, त्यामुळे या पदासाठी ते योग्य व्यक्ती आहेत यावर भाजपमध्ये एकमत होते. योजनेनुसार, प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आले होते. या प्रक्रियेत इतर कोणत्याही नेत्याने अर्ज केला नाही, त्यामुळे आज रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षासाठी निवड झाल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले. ‘रवींद्र चव्हाण आगे बढो’ असे नाहीतर फक्त ‘भाजपा आगे बढो’ असे म्हणायचे. या पदी निवड होणे म्हणजे, पक्षाने माझ्यावर केलेले उपकारच, असे माझे मत आहे. माझी ओळख भाजपा आहे.

२००२ साली पक्षाच्या कामाला सुरुवात केली आणि पक्षाचे काम करत एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच पक्षात होणार नाही. त्यामुळे माझ्यावर हे उपकार आहेत. पक्षाने मला मोठे केले, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. भाजपाची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आणि प्रभावी आहे. या विचारधारेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे सर्वांची जबाबदारी आहे.

२०१४ सालीच्या अगोदरचा काळ सर्वांनी आठवला पाहिजे, तेव्हापासून आजपर्यंत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आणि राज्यातील देवेंद्र सरकार असेल. ही सर्व मंडळी दिवसरात्र पाहत नाहीय. यांच्याकडून २४ तासांतले १८ तास करून देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे.

जबाबदारी केवळ भाजपा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवरच आहे. देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे काम केवळ आपल्याच पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता करत असतो, असे प्रामाणिक कार्यकर्ते इतर पक्षात नसून ते फक्त भाजपामध्येच आहेत. राष्ट्रीत्वाचा असणारा हा धागा सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचे आहे. २०२९ कडे लक्ष ठेवून आपल्याला चालायचे आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा : 

लुटारूशाही ही हिमाचल सरकारची ओळख

सोनिया गांधींशी ओळख करून दिली, सिद्धरामय्या माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले!

कझाकस्तानमध्ये आता नकाबवर बंदी

…तर ‘एअर लोरा’ कराची, रावळपिंडी, बहावलपूरला लक्ष्य करू शकते!

रवींद्र चव्हाण कोण आहेत?

रवींद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय नेते आहेत. प्रथम २००७ मध्ये ते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये ते विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडणूक जिंकले. त्यानंतर ते आमदार असताना कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे आणि पनवेल महानगरपालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व होते.

२०२४ मध्ये चौथ्यांदा आमदार

रवींद्र चव्हाण हे पालघरचे पालकमंत्री राहिले आहेत. २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण तिसऱ्यांदा आमदार झाले. २०२१ मध्ये त्यांना मंत्रीपदही देण्यात आले. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. २०२४ मध्ये रवींद्र चव्हाण चौथ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले. आतापर्यंत महाराष्ट्र भाजपची कमान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात होती. आता रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूलमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा