34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषउघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता

उघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता

Google News Follow

Related

महापालिकेच्या गलथान कारभारामुळे जनतेत संताप

मुसळधार पावसात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेलेला ४ वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. नालासोपाऱ्यात घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच हादरून सोडलं आहे. उघड्या गटारांमुळे अनेकांना आजवर इजा झाल्याच्या घटना आपल्याला माहित आहेत. परंतु ४ वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता असल्याने महापालिकेविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपारा पूर्व भागातील बिलालपाडा परिसरात रविवारी ही घटना घडली. अनमोल सिंग असे गटारात पडून वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.

वसई विरार महापालिका अग्निशमन दल, स्थानिक रहिवासी यांच्याकडून चिमुरड्याचा शोध सुरु आहे, मात्र तो अद्यापही सापडलेला नाही. नालासोपारा पूर्व बिलालपाड्याच्या हनुमान नगर चाळीमध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. घटनेला २४ तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही मुलगा कुठेच सापडला नसल्याने त्याचे कुटुंबीय मात्र हवालदिल झाले आहेत.

आजूबाजूचे नैसर्गिक नाले भूमाफियांनी बुजवली असल्याने मुसळधार पावसाचे पाणी पूर्णपणे चाळीत भरले होते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने आपल्या घरासमोर पाण्यात खेळताना मुलगा वाहत जाऊन उघड्या चेंबरमध्ये पडला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, जोरदार पावसामुळे मुंबईतील कांदिवली भागातही पोटरीभर पाणी साचलं होतं. कांदिवली वाहतूक चौकीसमोर एक व्यक्ती साचलेल्या पाण्यातून आपल्या लहान मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहातून चालताना फुटपाथला अडखळून तो पडला.

हे ही वाचा:

ठाण्यात भिंत कोसळून दहा गाड्यांचे नुकसान

महापालिकेच्या पार्किंगमध्ये ४०० गाड्यांना जलसमाधी

महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो

वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही

यावेळी रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोलीस राजेंद्र शेगर यांनी तत्परता दाखवली आणि ते त्याच्या मदतीला धावून गेले. हा पिता आपल्या मुलीला सुखरुप प्रवाहातून बाहेर काढून जाईपर्यंत त्यांनी सोबत केली आणि बापलेकीला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा