परशुराम हिंदू सेवा संघाच्या पुणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी अमृता देवगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
अमृता देवगावकर या पुणे शहरातील प्रथितयश व्यावसायिक असून समाजात शिक्षण आरोग्य रोजगार इत्यादी विषयांवर सतत काम करत असतात. त्यांच्या नियुक्तीचा फायदा समाजातील उदयोन्मुख तरुण तरुणींना होणार आहे, अशा भावना यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा:
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशींना अटक!
टोरेस घोटाळा : सीईओ तौसीफ रियाझच खरा सूत्रधार, झाली अटक
ठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !
अमृता देवगावकर यावेळी म्हणाल्या की, महिलांचे शिक्षण आरोग्य रोजगार या विषयात अधिक गांभीर्याने काम होणे आवश्यक आहे. हिंदू समाजातील प्रत्येक स्त्री आपल्या पायावर उभी असलीच पाहिजे. सामाजिक सुरक्षा व महिला यांच्यात असलेली क्षमता अधिक बळकट करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे.