34 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषफोन हॅकिंगप्रकरणी मंत्री वैष्णव यांनी विरोधकांना सुनावले

फोन हॅकिंगप्रकरणी मंत्री वैष्णव यांनी विरोधकांना सुनावले

अॅपल फोन हॅकिंग प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Google News Follow

Related

अॅपल फोन हॅकिंगच्या आरोपावरून राजकारण तीव्र झाले आहे.काही विरोधी नेत्यांच्या आरोपानंतर सरकारकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार या मुद्यावर गंभीर असून या समस्येच्या तळापर्यंत पोहोचेल.यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.अॅपल फोन हॅक प्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपावर मंत्री अश्विनी वैष्णव उत्तर देत निशाणा साधला आहे.

मंत्री म्हणाले की, काही लोक देशाची प्रगती पाहू शकत नाहीत. देशाची चिंता त्यांना अजिबात नाहीये.अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, १५० देशांमध्ये अॅपलने अॅडव्हायझरी जारी केली आहे.आपण आपला मेल पाहू शकता.अंदाजाच्या आधारे अलर्ट पाठवण्यात आला आहे.अॅपलने असा दावा केला आहे की, त्यांना कोणीही हॅक करू शकत नाही.ते म्हणाले, अॅपलने स्वतः म्हटले आहे की, टीका करणारेच असे प्रयत्न करत आहेत.लक्ष वेधून घेणारे राजकारण होत आहे.देश प्रसिद्धी कमवत आहे हे त्यांना पटत नाही.

हे ही वाचा:

‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’

डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल

केजरीवाल यांना ईडीकडून समन्स

मोबाईल फोन हॅकिंग प्रकरणी विरोधक चांगलेच तापले आहेत.विरोधी पक्ष नेते महुआ मोईत्रा, प्रियंका चतुर्वेदी,शशी थरूर,पवन खेडा,राघव चड्डा यांनी दावा केला की, त्यांचे फोन हॅक केले जात आहेत.त्यांचा फोन हॅक केल्याचा अलर्ट अॅपलकडून देण्यात आले आहेत.अॅपलकडून देण्यात आलेल्या अलर्टमध्ये सरकार त्यांचा फोन हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, केंद्र सरकारने या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.सरकार या प्रकरणाच्या तळापर्यंत जाईल असे वैष्णव यांनी सांगितले.

आपल्या देशात काही सक्तीचे टीकाकार आहेत, ज्यांना अशी सवय लागली आहे की, कोणताही मुद्दा असो हे लगेच जागे होतात आणि टीका करू लागतात.जेव्हा त्यांच्या कुटुंबाने देशावर राज्य केले तेव्हा त्यांनी एकच उद्दिष्ट ठेवून काम केले ते म्हणजे फक्त स्वतःच्या कुटुंबाचे पोषण कसे करावे.त्यांना देशाची चिंता नाही.देशाची उंचावत चाललेली प्रगती त्यांना दिसतही नाही आणि पचवताही येत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रमाणे भारत पुढे जात आहे, जगात नाव कमावत आहे हे त्यांना दिसत नसून फक्त बदनामी करण्याचे काम त्यांच्याकडे असल्याचे मंत्री वैष्णव म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा