अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारल्यानंतर रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मंदिर बांधणीसाठी देशभरातील श्रद्धाळूंनी उदंड प्रमाणात देणग्या दिल्या असून, देणगीदारांची संख्या सतत वाढत आहे. राममंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, देशभरातील भक्तांनी आतापर्यंत रामलला मंदिरासाठी तब्बल ३,००० कोटी रुपयांचे दान दिले आहे, ज्यापैकी मोठा भाग मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर समितीने निर्णय घेतला आहे की २५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ध्वजरोहण समारंभात वर्ष २०२२ नंतर देणगी दिलेल्या सर्व दानदात्यांना आमंत्रित केले जाईल. तसेच मंदिर उभारणीत योगदान देणाऱ्या कंपन्या, पुरवठादार आणि कामगारांनाही या सोहळ्यात सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही माहिती राममंदिर बांधकामाबाबत गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या समिती बैठकीपूर्वी अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत १,५०० कोटी रुपयांची बिलिंग पूर्ण झाली असून, एकूण बांधकाम खर्च १,८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा :