33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषरायगडावर निर्बंधमुक्त शिवराज्याभिषेकाचा अमाप उत्साह

रायगडावर निर्बंधमुक्त शिवराज्याभिषेकाचा अमाप उत्साह

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचा शिवराज्याभिषेक दिन आज, ६ जून रोजी रायगडावर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. दरवर्षी ६ जून रोजी शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंध असल्यामुळे शिवप्रेमींना या सोहळ्यात सहभागी होता आले नव्हते.  मात्र, यंदाच्या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मोठ्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते.

छत्रपती घराण्याचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती रायगडावर दाखल झाले होते.  गडावर उपस्थित महिलांनी युवराज संभाजी छत्रपती महाराज, व युवराजकुमार शहाजी छत्रपती यांचे औक्षण केले. आधी ध्वजपूजन आणि मग महाराजांचा अभिषेक अशा अनेक संपन्न अशा पारंपरिक गोष्टी साकारून राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच रायगडवर जल्लोष, ढोल ताशांचा गजर पाहायला मिळाला होता. कालपासूनच रायगडावर या सोहळ्याची लगबग सुरु होती. राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गडावर अनेक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

हे ही वाचा:

मूसेवाला हत्येप्रकरणी पुण्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या

‘ठाकरे सरकारमधील मंत्री टक्केवारी मागतात’

१८ वर्षात नदालला १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद

नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू

६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या दिवशी मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर स्नान करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. गंगेसह विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याच्या जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात आला होता. विविध वाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा