दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांना निदर्शनादरम्यान ताब्यात घेण्यात आले. हे विद्यार्थी दोन विद्यावाचस्पती विद्यार्थ्यांवर झालेल्या शिस्तभंगाची कारवाई केल्याचा निषेध करीत होते. अधिकाऱ्यांनुसार, शिस्तभंगाची कारवाई झालेल्या दोनही विद्यार्थ्यांना मागील वर्षी करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या कारवाईच्या निषेधात सोमवारपासून निदर्शने सुरु झाली, यावर प्रशासनाने उगारलेल्या कारवाईचा देखील निषेध करण्यात आला.
पीटीआयच्या बातमीनुसार, विद्यापीठाने दावा केला आहे की निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅन्टीनसोबतच विद्यापीठाच्या मालमत्तेचेही नुकसान केले आहे. निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरक्षा सल्लागार कार्यालयाचे गेट तोडल्याने त्यांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निदर्शनकाऱ्यांना निषेधस्थळावरून हटविण्यासाठी विद्यापीठाने आपणहून पोलिसांना हस्तक्षेपाची विनंती केल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
दलाई लामा यांना केंद्राकडून झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान!
दिल्लीपुढे न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी करतायेत!
विद्यार्थी नेत्या सोनाक्षीने पीटीआयला सांगितले की, निदर्शकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत:
दोन पीएचडी विद्यार्थ्यांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीस रद्द करणे,
कॅम्पसमध्ये निदर्शने प्रतिबंधित करणारा २०२२ चा ऑफिस मेमोरँडम रद्द करणे,
भित्तीचित्रे आणि पोस्टर्ससाठी ५०,००० रुपयांचा दंड रद्द करणे
निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांवर भविष्यात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई होणार नाही याची खात्री करणे.
२०१९ च्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) निषेधाच्या वर्धापन दिनानिमित्त डिसेंबर २०२४ मध्ये दोन पीएचडी विद्यार्थ्यांनी विना परवानगी “जामिया प्रतिकार दिन” कार्यक्रम आयोजित करन्यासाचे ठरवले होते, ज्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नोटीसला उत्तर न मिळाल्याने विद्यापीठाला कारवाई करणे भाग होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाकडून निदर्शनाला सुरुवात केली. दरम्यान विद्यापीठाच्या मागणीवरुन पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे.