31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेष'शीजान तुनिषाला इस्लाम स्वीकारण्याची सक्ती करत होता'

‘शीजान तुनिषाला इस्लाम स्वीकारण्याची सक्ती करत होता’

तुनिशाला उर्दू शिकवण्यात आली आणि ती उर्दू बोलू लागली

Google News Follow

Related

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शीजान खानवर केलेला आहे. शीजान खान पोलिस कोठडीत असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शीजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

वनिता शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, शीजान आपल्या मुलीची फसवणूक करत होता. तुनिषाने सांगितले होते की शीजान ड्रग्सचे सेवन करतो. तुनिषाच्या वागण्यातही काही बदल दिसून आले होते. शीजानने तिला इस्लाम धर्माचे पालन करण्याची जबरदस्ती करत होता.

तुनिषाला मारहाण करायचा

शीजानला शिक्षा होईपर्यंत मी गप्प बसणार नाही, असे तुनिषाची आई वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तुनिषाने एकदा शीजानचा फोन तपासला आणि तिला कळले की शीजान आपली फसवणूक करत आहे. याबाबत तिने शीजानला विचारले असता, त्याने तुनिषाला मारहाणही केली होती.

शीजानचे कुटुंबीय ब्लॅकमेल करायचे

शीजानने अनेक महिने आपल्या मुलीचा वापर केल्याचेही त्यांनी सांगितले. वनिता शर्मांचा आरोप आहे की, शीजान आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला इतके गुंतवले की, ती माझ्यापासून दूर होत गेली. त्याने फसवायला नको होते. जर तो दुसऱ्या नात्यात गुंतला असेल तर त्याने माझ्या मुलीला सांगायला हवे होते. तुनिषाला फसवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तिला शीजानच्या कुटुंबाकडून ब्लॅकमेल केले जात होते. तुनिषाला उर्दू शिकवण्यात आली आणि ती उर्दू बोलूही लागली होती.

खोलीतून बाहेर काढले पण रुग्णवाहिका बोलवली नाही

शीजान खानवर आरोपांचा वर्षाव करताना वनिता शर्मा यांनी हेही उघड केले की, तुनिषाच्या मृत्यूच्या वेळी त्याने तिला खोलीतून बाहेर काढले. परंतु रुग्णवाहिका बोलावली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा