ठाकरे आणि मनसे यांची युती होणार का? असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला काही पडलेला नाहीये. त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला असेल, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संकेत नाही तर बातमीच देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि या विधानावरून प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भातखळकर बोलत होते.
महाराष्ट्राच्या जनतेचे क्लिअर कट आहे कि भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत जिंकून द्यायचे आहे. कारण त्यांना विकासाचे तिसरे इंजिन महाराष्ट्राला जोडायचे आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाहीये, असे भातखळकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे गट-मनसे एकत्र येवू इच्छित असतील तर त्यांनी जरून यावे. याबाबत त्यांच्या पक्ष प्रमुखांनी निर्णय घ्यावा. पण, राज्याच्या जनतेने ठरवलं आहे. केंद्रा प्रमाणे, राज्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीला निवडून द्यायचे आहे.
त्यामुळे यांच्या युतीबाबत महाराष्ट्रासमोर काही प्रश्न पडला असेल असे मला वाटत नाही. त्यांचं नातं आहे, त्यामुळे दोन भाऊ एकत्र आले तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्याचा काही विरोध नाही. कारण त्याच्यामुळे आमच्या राजकीय यशावर कोणताही परिणाम होणार नाही, याची आम्हाला ठाम खात्री आहे.
हे ही वाचा :
एनआयएने गोल्डी बरारसह ५ जणांविरुद्ध केले आरोपपत्र दाखल
भाजप विकासाच्या अजेंड्यावर काम करणारा पक्ष
मुला-मुलींची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी पुण्यात
विशाळगडावर बकऱ्यांच्या कुर्बानीस बंदीनंतर साखर वाटून आनंद साजरा
दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो. आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही.
कोणी कोणाशी युती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये कोणतेही कन्फ्युजन नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच येणार pic.twitter.com/hbiqyEl3sV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 6, 2025
