केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शनिवारी सांगितले की, देशभरात ३३ कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना आता एलपीजी सिलेंडर बुकिंगनंतर काहीच तासांत घरपोच मिळतो. जागतिक एलपीजी दिनाच्या निमित्ताने पुरी यांनी या व्यापक पोहोच आणि कार्यक्षमतेचं श्रेय प्रत्येक घरात स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या सततच्या प्रयत्नांना दिलं.
पुरी म्हणाले, “देशभरात, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत बदल घडवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.” त्यांनी नमूद केलं की, “पीएमयूवाय अंतर्गत १०.३३ कोटींपेक्षा अधिक महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहे, ज्यामुळे त्या पारंपरिक, धुराळ्याच्या इंधनापासून सुरक्षित आणि स्वच्छ एलपीजीकडे वळल्या आहेत.”
हेही वाचा..
राज-उद्धव एकत्र येतीलही, पण लोक महायुतीलाच निवडून देणार!
रिलिझच्या वेळी खूप घाबरले होते
राहुल गांधी पाकिस्तानचा प्रवक्ता असल्यासारखे वागतात
पुरी पुढे म्हणाले, “या क्रांतीने स्वयंपाकघरातील धूर कमी करून केवळ आरोग्य सुधारले नाही, तर महिलांचा मौल्यवान वेळ वाचवला आहे, ज्यामुळे त्यांचा जीवनमान उंचावला आहे.” त्यांनी एलपीजी उत्पादन आणि वितरणात गुंतलेल्या कामगारांचे कौतुक करताना सांगितलं की, “भारताचं एलपीजी नेटवर्क आता दुर्गम गावांपासून ते शहरी अपार्टमेंट्सपर्यंत प्रत्येक भागाला व्यापून टाकतं आहे.”
पुरी म्हणाले, “आज देशातील दुर्गम भागांपासून ते शहरी बंगल्यांपर्यंत, एलपीजीसारखं स्वच्छ इंधन लोकांच्या जीवनात सुलभता आणत आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, “आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमतीत सुमारे ५८ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी भारतात पीएमयूवाय लाभार्थ्यांना १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर केवळ ५५३ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर नियमित ग्राहकांसाठी ही किंमत ८५३ रुपये आहे.” सरकारने इंधन परवडण्यासारखे राहावे यासाठी विविध सक्रिय पावले उचलली आहेत. यामध्ये प्रमुख म्हणजे उत्पादन शुल्कात कपात करणे आणि तेल विपणन कंपन्यांना किंमतवाढीचा भार उचलण्यासाठी प्रोत्साहन देणे. पुरी म्हणाले, “मोदी सरकारच्या कार्यकाळात एलपीजी क्रांतीमुळे लाखो झाडांची कत्तल टळली आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षणही साधले आहे.”
