30 C
Mumbai
Friday, May 16, 2025
घरविशेष'ऑपरेशन सिंदूर': दहशतवादी मसूद अझहर म्हणाला, मीही मेलो असतो तर बरे झाले...

‘ऑपरेशन सिंदूर’: दहशतवादी मसूद अझहर म्हणाला, मीही मेलो असतो तर बरे झाले असते!

कुटुंबातील १० जणांचा मृत्यू, जवळचे चार सहकारीही मेले

Google News Follow

Related

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की, भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले आहेत.

आज तकच्या बातमीनुसार, या हल्ल्यानंतर, दुःखी मसूद अझहर म्हणाला की, या हल्ल्यात मीही मारला गेला असता तर बरे झाले असते. जैश-ए-मोहम्मदने एका निवेदनात म्हटले आहे की, मौलाना मसूद अझहर यांच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ यांचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे आणि मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातवंडे, बाजी सादिया यांचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत.”

हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आज दफन करण्यात येईल. दरम्यान, काल रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पंजाबमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या वहावलपूरसह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे अनेक कमांडर ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचीही माहिती आहे.

हे ही वाचा : 

‘आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताचे प्रत्युत्तर’

ऑपरेशन सिंदूर: दहशतवादाचा तळ नष्ट करण्यासाठी भारताने दिलेली प्रतिक्रिया; काय म्हणाले परराष्ट्र सचिव

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?

“दहशतवाद्यांनी कुंकू पुसलेल्या महिलांचा पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधून केला आदर!”

गुप्त माहितीच्या आधारे भारताने हल्ला चढवत जैश-ए-मोहम्मद मुख्यालय उध्वस्त करून टाकले. भारताच्या कारवाईनंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. ‘जय हिंदी’, ‘भारत माता कि जय’ अशा पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा