25 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषममतांविरोधात डॉक्टरांचे 'नबन्ना अभियान', पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, पाण्याचा मारा !

ममतांविरोधात डॉक्टरांचे ‘नबन्ना अभियान’, पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर, पाण्याचा मारा !

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी

Google News Follow

Related

आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने होत आहेत. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि हावडामध्ये डॉक्टरांनी संप पुकारला असून ममता सरकार विरोधात ‘नबन्ना अभियान’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या दिशेने ‘नबन्ना अभियान’ काढणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत, तसेच आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची आणि बलात्कार-हत्या प्रकरणाला जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी, या आंदोलनातून करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी आहेत. ‘नबन्ना’ हे पश्चिम बंगाल सरकारचे सचिवालय आहे. विद्यार्थ्यांच्या संघटनांनी ‘नबन्ना’च्या दिशेने निषेध मोर्चा काढण्याची योजना आखत त्या दिशेने कूच करण्यासाठी हावडा येथील संत्रागाछी येथे जमा होत आहेत. परंतु, आंदोलकांना राज्य सचिवालयाकडे (नबन्ना) कूच करण्यापासून रोखण्यासाठी, पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याच्या मारा, अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज केला जात आहे. आंदोलक हावडा ब्रिजवर लावलेल्या बॅरिकेड्सवर चढताना आणि तिरंगा फडकवताना दिसले. या घटनेचे व्हीडीओ देखील समोर येत आहेत.

हे ही वाचा :

महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा हरमनकडे

मुंबईत दहीहंडीचा उत्सव शिगेला; १५ गोविंदा जखमी

पंतप्रधान मोदींवर टिप्पणी करणाऱ्या सपा नेता हाजी रझाच्या तीन मजली इमारतीवर बुलडोजर !

एक लाखाहून अधिक गोविंदांना विम्याचे सुरक्षा कवच

दरम्यान, कोलकाता पोलीस आणि हावडा पोलिसांनी राज्य सचिवालयाजवळ आणि आजूबाजूच्या परिसरात २० हून अधिक ठिकाणी लोखंडी आणि ॲल्युमिनियमचे बॅरिकेड्स लावले आहेत. तसेच या मार्गावर ६,००० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हेवी रेडिओ फ्लाइंग स्क्वॉड्स (एचआरएफएस), रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि क्विक रिॲक्शन टीम्स (क्यूआरटी) यासह वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून अतिरिक्त सैन्ये देखील आणण्यात आली आहेत. आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि रोबोकॉपचा वापर केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा