30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषजम्मू-काश्मीर: प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी!

जम्मू-काश्मीर: प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी!

लष्कराकडून पुलवामामधील जिवंत IED बॉम्ब निकामी

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी एक आयईडी (IED) शोधून काढला आणि बॉम्ब पथकाच्या मदतीने तो निकामी केला. भारतीय लष्कराला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी हा आयईडी पेरला होता.आगामी प्रजासत्ताक दिनापूर्वी भारतीय लष्कराला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा डाव अयशस्वी झाला आहे.

दहशतवाद्यांची माहिती गोळा करण्यासाठी लष्कराकडून शोध मोहीम राबविली जात आहे.या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी पेरलेला आयईडी बॉब लष्कराच्या हाती सापडला.बॉम्ब पथकाच्या मदतीने आयईडी बॉब निकामी करण्यात आला आहे.सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे मोठी दहशतवादी घटना टळली.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापूर्वीच दहशतवाद्यांचा स्फोट करण्याचा डाव लष्करणाने उधळून लावला आहे.

हे ही वाचा:

मालदीवमधून लष्कर माघारी बोलावण्याचे कोणतेही आदेश नाहीत!

नरेंद्र मोदींवर नव मतदार खुश!

जागावाटपावर एकमत झाले नाही, तर ‘इंडिया’ आघाडीचे खरे नाही

मनोज जरांगेच्या भगव्या वादळाला मुंबई पोलिसांचा लगाम!

दरम्यान, यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. राजौरीतील डेरा गल्ली भागातील दहशतवाद्यांनी दोन लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला.दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांकडून देखील प्रत्युत्तर देखील देण्यात आले.दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार जवान हुतात्मा तर पाच जवान जखमी झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा