28 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरविशेषशमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग

शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग

७ बळी घेत न्यूझीलंडला रोखले

Google News Follow

Related

भारताने आयसीसी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत झोकात प्रवेश केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताने ७० धावांनी दणदणीत मात करत चौथ्यांदा वनडे वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी एक संघ भारताच्या समोर असेल.

 

भारताने या स्पर्धेतील उपांत्य फेरीआधीचे सगळे सामने जिंकले. उपांत्य फेरीतील विजय हा भारताचा या स्पर्धेतील सलग १०वा विजय होता. मोहम्मद शमी हा भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने ५६ धावांत ७ बळी घेत न्यूझीलंडचे विजयाचे स्वप्न उद्ध्वस्त केले. त्यामुळे भारताच्या ३९७ धावांना उत्तर देताना न्यूझीलंडला ३२७ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताची आता अंतिम फेरीत धडक मारण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी, १९८३, २००३, २०११ या वर्षात भारताने वर्ल्डकप अंतिम फेरी गाठली. त्यापैकी १९८३ आणि २०११ ची वर्ल्डकप स्पर्धा भारताने जिंकली आहे.

 

भारताच्या ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल (१३४) आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी केली. त्यावेळी भारताच्या हातून हा सामना निसटणार का, अशी शंका येत होती. पण त्याचवेळी शमी मदतीला धावून आला. त्याआधी त्याने २ फलंदाजांना टिपले होतेच पण ही भागीदारी त्याने फोडली. विल्यमसनचा मोठा फटका खेळण्याच्या नादात बळी गेला आणि तिथून पुढे न्यूझीलंडचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद होत गेले. मिचेल आणि विल्यमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला घाम फोडला होता. विल्यमसन बाद झाल्यावर ग्लेन फिलिप्सने मिचेलला साथ दिली पण बूमराहने ही जोडी फोडली. त्यानंतर मात्र न्यूझीलंडला कुणीही सावरू शकले नाही. मोहम्मद शमी हाच या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला.

 

त्याआधी, भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीने ११७ धावांची खेळी करत नवा विक्रम नोंदविला. सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांचा विक्रम विराटने मोडला. त्याने ५०वे वनडे शतक झळकाविले. वानखेडे स्टेडियमवरील हे त्याचे शतक केल्यानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या सचिनला अभिवादन केले. सचिननेही उभे राहात टाळ्या वाजवून विराटचे कौतुक केले.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज

पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर महिलेने घेतली उडी

जम्मू- काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून अपघात; ३० ठार

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात

 

मुंबईच्या श्रेयस अय्यरनेही १०५ धावांची खेळी केली. दोघांनी १६२ धावांची भागीदारी केली. तत्यांच्या या खेळीमुळे भारताने चारशेच्या जवळ जाणारी धावसंख्या रचली. त्याआधी, रोहित शर्मानेही ४७ धावांची खेळी केली आणि सलामीवीर शुभमनसह (८०) ९३ धावाही जोडल्या. शुभमन मात्र पायात पेटके आल्यामुळे सामना सोडून तंबूत परतला.

 

 

मोदींकडून शमीचे कौतुक

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल कौतुक केलेच पण या सामन्यात दमदार गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीचीही प्रशंसा केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा