25 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषमुख्‍यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर

मुख्‍यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर

आमदार आशिष शेलार

Google News Follow

Related

आमचाच मुख्‍यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्‍गना करणा-या उबाठा गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्‍या महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यातील चित्र समोर आले आहेत. तसेच ज्‍याचे आमदार जास्‍त त्‍यांना मुख्‍यमंत्री पद हा महायुतीचा फॉम्‍युला होता हे सत्‍य ही आज उध्‍दव ठाकरे बोलून गेले म्‍हणजे त्‍यावेळी ते मुख्‍यमंतत्री पद मागत होते ते कपोलकल्पित होते अशी प्रतिक्रीया मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली

महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यानंतर माध्‍यमांनी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अँँड आशिष शेलार यांना प्रतिक्रीया विचारली असता ते म्‍हणाले की, मुख्‍यमंत्री पदावरुन उध्‍दव ठाकरे यांनी आज जे विवेचन केले त्‍यावरुन उबाठाचे तारे जमी पर आगये असे चित्र आहे. आमचाच महाराष्‍ट्रात चेहरा, मुख्‍यमंत्री पदी पुन्‍हा उध्‍दव ठाकरेच अशा वल्‍गना उबाठाकडून करण्‍यात येत होत्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी दिल्ली जाऊन आले तरी मागणी मान्‍य होत नाही. सल्वि‍र ओकला बैठका झाल्‍या तरीही मागणी मान्‍य झाली नाही त्‍यामुळे त्‍यांनी आज हे विधान केले. त्‍यांच्‍यातली धुसमूस बाहेर येत असून ही लाथाबुक्‍यांपर्यंत जाऊ नये, अशी टीपणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा..

सण, उत्सव असल्यामुळे राज्यात निवडणुका आत्ता नाहीत

आंदोलनामुळे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे नुकसान झाले!

फेसबुकवर नाही तर फेस टू फेस काम करणारे सरकार

कलम ३७० रद्दनंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच होणार विधानसभा निवडणुका

कोरोना काळात ज्‍यांनी भ्रष्‍टाचार केले, पदविधरांचे भविष्‍य विस्‍कटले, त्‍यांच्‍या मुख्‍यमंत्री काळात माता भ‍गि‍नींवर अन्‍यायाचे पहाड कोसळावे अशी परिस्‍थि‍ती निर्माण केली, रोजगार निर्मितीचे, आर्थि‍क गुंतवणुकीचे प्रस्‍ताव आले जे महाराष्‍ट्राच्‍या हिताचे होते त्‍याला विरोध केला. संपादकांना अटक, बोलू द्यायचे नाही, लोकशाहीला धोक्यात आणले. ज्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रकल्‍प रोखले, महाराष्‍ट्राला बदनाम केले त्‍या महाविकास आघाडीला, त्‍या महाराष्‍ट्र द्रोह्यांना तडीपार करणे, हद्दपार करणे, हाच आमचा कार्यक्रम आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

सरडा ही आत्‍महत्‍या करेल

संजय राजाराम राऊत हे तर एवढे रंग बदलतात की सरडाही आत्‍महत्‍या करेल आणि सरड्याच्‍या कुटुंबाने तक्रार केली तर राऊत यांच्‍यावर गुन्‍हा दाखल होईल, असा टोलाही आमदार अँँड आशिष शेलार यांनी लगावला आहे. कारण ते सीए, शेतकरी, एनआरसी सारखे कायदे आले की सभागृहात बाजू घेतात बाहेर येऊन विरोध करतात, ते मातोश्रीच्‍या बाजूने आहेत की सिल्‍वर ओक हेही लोकांना कळत नाही. ते ज्‍या पध्‍दतीने रंग बदलत असतात त्‍यावरुन सरडाही आत्‍महत्‍या करेल, असो टोला लगावला

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा