27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेषभटक्या कुत्र्यांमुळे डोक्याला इजा होऊन 'वाघ बकरी चहा'चे संचालक पराग देसाई यांचा...

भटक्या कुत्र्यांमुळे डोक्याला इजा होऊन ‘वाघ बकरी चहा’चे संचालक पराग देसाई यांचा मृत्यू

वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

वाघ बकरी चहा समुहाचे मालक आणि कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद मधील खाजगी रुग्णालयात वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई यांचा १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा अपघात झाला होता. तेव्हा त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पराग देसाई हे अहमदाबादमधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर सकाळी वॉक साठी गेले होते. यावेळी काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांना उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांना व्हेंटीलेटरवर देखील ठेवण्यात आलं होतं.

पराग देसाई यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी

गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली

बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

पराग देसाई यांची कारकीर्द

पराग देसाई गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. पराग यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधील एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. ते वाघ बकरी चहा व्यवसायातील त्यांची चौथी पिढी होते. त्यांनी वाघ बकरी चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत ब्रँडला आणखी उंचीवर नेलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा