25 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024
घरविशेषपॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक

पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक

प्रीती पालचा एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा पराक्रम

Google News Follow

Related

क्रीडा विश्वात मानाची मानली जाणारी अशी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा यंदा पॅरिसमध्ये असून साऱ्यांचे लक्ष या खेळांकडे आहे. ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वी पार पडल्यानंतर आता पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धा रंगात आली आहे. भारताच्या खेळाडूंकडून या स्पर्धेत दमदार कामगिरी सुरू असून पदकांची भरही पडत आहे. रविवारी रात्री झालेल्या खेळांमध्ये भारताला दोन पदके मिळाली आहेत. धावपटू प्रीती पाल हिने आणखी एका कांस्य पदकाची कमाई करत पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचे दुसरे पदक पटकावले. तर निशाद कुमार याने पुरुषांच्या उंच उडी टी ४७ प्रकारात रौप्य पदक पटकावले. भारताच्या खात्यात आता सात पदके आहेत.

पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने महिला गटातील २०० मीटर टी ३५ अंतिम फेरीत ३१.०१ सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरा क्रमांक मिळवला. यासह तिने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. याआधी प्रीतीने महिलांच्या १०० मीटर टी ३५ प्रकारात जबरदस्त कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. ऍथलेटिक्समधील ट्रॅक प्रकारात पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी प्रीती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली होती. तर, आता एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा पराक्रम देखील प्रीतीने केला आहे.

या स्पर्धेत चीनच्या जिया झाऊ हिने सुवर्णपदक पटकावले आहे. जिया झाऊने शर्यत पूर्ण करण्यासाठी २८.१५ सेकंद घेतले. तसेच चीनची गुओ कियान दुसऱ्या स्थानावर होती तिने ही शर्यत २९.०९ सेकंदात पूर्ण केली. यानंतर प्रीती पाल हिने तिसरा क्रमांक मिळवला. हायपरटोनिया, ऍटॅक्सिया आणि ऍथेटोसिस सारख्या समन्वय विकारांनी ग्रस्त असलेले खेळाडू टी-३५ मध्ये भाग घेतात.

हे ही वाचा:

ममता दीदी भेट देईनात, टीएमसी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीचा छापा

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाची तुलना तरी होईल का?

विद्यार्थ्यांना पारंपारिक वेशभूषा, वस्तू वापरावर बंदी आणल्यास होणार कारवाई

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण सात पदके जिंकली आहेत. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदक आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत. अवनी लेखरा हिने आतापर्यंत या पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले आहे. तर, भारतीय शटलर्स नितीश कुमार आणि सुहास यथीराज यांनी भारतासाठी पदक निश्चित केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा