काँग्रेस नेते राहुल गांधी हे वारंवार भारताला पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात नेमके किती नुकसान झाले, याविषयी विचारणा करत आहेत. आता तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेच देशद्रोही आहेत असा आरोप काँग्रेसकडून केला जाऊ लागला आहे. यासंदर्भात मेजर जनरल (निवृत्त) आणि संरक्षण तज्ज्ञ ध्रुव कटोच यांनी राहुल गांधी यांची विधाने ही बेजबाबदारपणाची असून असे प्रश्न विचारणे योग्य नाही, अशी टिप्पणी केली आहे.
संरक्षण तज्ज्ञ ध्रुव कटोच यांनी या संपूर्ण संघर्षाचे वर्णन केले. ते म्हणाले, “… ऑपरेशन सिंदूर दोन टप्प्यांत राबवण्यात आले. पहिला टप्पा होता दहशतवादी तळांवर हल्ला करणे. दुसरा टप्पा पाकिस्तानच्या प्रतिक्रिया काय असतात त्यावर अवलंबून होता. पहिल्या टप्प्यानंतर, भारताने पाकिस्तानला कळवले की आम्ही ९ ठिकाणांवर हल्ला केला आहे, कोणत्याही नागरी पायाभूत सुविधेला इजा झालेली नाही आणि आम्ही यापुढे हे वाढवणार नाही. पण पाकिस्तानने त्यानंतरही हल्ला चढवला, त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या हल्ल्यांना निष्प्रभ केले. आमची कोणतीही योजना किंवा हालचाल पाकिस्तानला हल्ल्यांपूर्वी सांगितली नव्हती, हे परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. हल्ल्यांनंतरच पाकिस्तानला कळवले गेले की त्यांनी प्रतिक्रिया दिली तर परिणाम गंभीर होतील, पण त्यांनी ती प्रतिक्रिया दिली आणि त्याचा त्यांना फटका बसला.”
हे ही वाचा:
“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”
त्रिकोणाचा चौथा कोन: राहुल गांधी
पाक हेर तारीफने सिरसात एअरबेसचे फोटो काढले…याच तळाला पाकने आता लक्ष्य केलं
मशीद समितीला दणका! संभलमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा
राहुल गांधी यांच्याकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांबद्दल कटोच म्हणाले, “राहुल गांधी फारच बेजबाबदारपणे वागत आहेत. जेव्हा ते हानी आणि हुतात्म्यांबाबत प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांनी लक्षात घ्यायला हवे की, युद्धामध्ये हानी होतच असते, पण कोणताही देश आपले नुकसान सार्वजनिकपणे बोलून दाखवत नाही. राहुल गांधी यांनी असा प्रश्न विचारणे ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. त्यांनी याऐवजी विचारले पाहिजे की, भारतीय लष्कराने नेमून दिलेली उद्दिष्टे साध्य केली की नाही. मला आशा आहे की भविष्यात त्यांच्याकडून अधिक शहाणपण दाखवले जाईल.”
