27 C
Mumbai
Saturday, November 26, 2022
घरविशेषभिडेंचे वक्तव्य विक्षिप्त; पण त्याविरोधातल्या मागण्या अवास्तव

भिडेंचे वक्तव्य विक्षिप्त; पण त्याविरोधातल्या मागण्या अवास्तव

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून उडाली होती खळबळ

Google News Follow

Related

“कुंकू लावले , तरच बोलेन” संभाजी भिडे यांचे पत्रकाराला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य : महिला आयोगाची नोटीस ”  -अशा बातम्या,  तसेच  “भिडे यांनी महिला पत्रकाराच्या ‘खासगीपणा’च्या अधिकाराचे उल्लंघन होईल असे वर्तन करीत ‘विनयभंग’ केल्यामुळे त्यांच्या विरोधात (भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ नुसार)  गुन्हा दाखल करावा, ” (!) – ही वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ठाकूर यांची मागणी वाचली.

यामध्ये हे लक्षात येते, की भिडे यांचे वक्तव्य जितके विक्षिप्त, तऱ्हेवाईक आणि अनावश्यक, तितक्याच त्यांच्याविरुद्ध येणाऱ्या प्रतिक्रियाही प्रमाणाबाहेर, अतिरंजित, अतिउत्साही स्वरूपाच्या दिसतात.
१. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी (रुपाली चाकणकर यांनी) केलेल्या निषेधात – “टिकली वरून महिलेची पात्रता आणि पद ठरवण्याचा ” उल्लेख केला आहे. टिकली / कुंकू न लावलेल्या महिलेशी एखाद्याने ‘न बोलणे’ हे ‘तिची पात्रता ठरवणे’ कसे होऊ शकते ? कोणाशी बोलणे / न बोलणे हा एखाद्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. एखाद्याचा जर विशिष्ट वेशभूषा / परिधान असलेल्यांशी च मी बोलेन, असा आग्रह असेल, तर तो त्याचा विक्षिप्तपणा म्हणून सोडून द्यावा लागेल. तुम्ही सरसकट सर्वांशी बोलावे असा आग्रह धरणे चुकीचे ठरेल. ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर अतिक्रमण ठरेल.
हे ही वाचा:
२. “टिकली पेक्षाही गंभीर आहे, ते आमची भारतमाता विधवा नाही, असे विधान करणे.” – ही आणखी एक ‘सुविद्य, पुरोगामी’ प्रतिक्रिया. इथे – “भारतमाता विधवा नाही.” – या विधानाचा शब्दशः कीस काढण्याची गरज नाही. पण – “ती विधवा नाही, तर मग तिच्या कुंकवाचा धनी कोण ?” असा प्रश्न ज्येष्ठ, जाणकार, सुविद्य विद्वान म्हणवणाऱ्या पत्रकारांकडून विचारला जातो, तेव्हा खरी ‘पोटदुखी’ कुठे आहे, ते लक्षात येते ! “देशाची मालकी विशिष्ट समुदायाकडे असल्याचे हे सूचन असू शकते.” इथपर्यंत ह्या विद्वान पत्रकारांची मजल जाते ! गुरुजींच्या एका किंचित विक्षिप्त विधानावरून “हिंदुराष्ट्रा” पर्यंत अर्थ ओढूनताणून काढणे, हा अक्षरशः सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार झाला. “भारतमाता विधवा नाही” – या म्हणण्यात खरेतर काहीही चूक नाही. पण हे सरळसरळ मान्य केले, तर पुढे जे तारे तोडायचे आहेत, ते कसे तोडता येणार ? म्हणून शाब्दिक पांडित्याची सगळी कसरत !
३. रेखा ठाकूर यांची मागणी म्हणजे तर अक्षरशः बालिशपणाच  आहे. ‘भा दं सं कलम ५०९ ‘ – हे अगदी स्पष्टपणे महिलांच्या बाबतीत उघड / छुप्या लैंगिक हेतूने केलेल्या कृत्यांसंबंधी आहे. ते कलम शब्दशः असे आहे :
मूळ इंग्रजी :
“Word, gesture, or act intended to insult the modesty of a woman – whoever intending to insult the modesty of any woman utters any word, makes any sound or gesture or exhibits any object, intending that such word or sound shall be heard or that such gesture or object shall be seen by such woman or intrudes upon the privacy of such woman shall be punished with imprisonment or fine or both under this Act.”  (IPC Section 509) 
 
“शब्दोच्चार, खाणाखुणा, हावभाव, ज्यांचा हेतू स्त्रीचा – तिच्या आत्मसन्मानाचा अवमान करण्याचा (त्याला धक्का पोचवण्याचा ) असेल, – असे शब्द / हावभाव जो कोणी अशा हेतूने असे काही शब्द, खाणाखुणा यांचा वापर करील, किंवा एखादी वस्तू दाखवील, – ज्यात हा हेतू स्पष्ट असेल, की तिने ते शब्द ऐकावेत, त्या खाणाखुणा किंवा त्या वस्तू  बघाव्यात – तसेच जो तिच्या खासगीपणाचा भंग करील, तो ह्या कलमाखाली शिक्षेस पात्र ठरेल.” 
(इथे शब्द, हावभाव, किंवा वस्तू – यांतून उघड / छुप्या रीतीने एखाद्या स्त्रीला लैंगिक तऱ्हेने खिजवण्याचा, उद्विग्न करण्याचा प्रयत्न करणे हेच अभिप्रेत आहे.उदाहरणार्थ सुंदर आकर्षक तरुणीला पाहून शीळ घालणे, तिच्या कामाच्या टेबलवर, तिला सहज दिसेल अशा तऱ्हेने प्ले बॉय / डेबोनेर सारखे उत्तन लैंगिक चित्रांचे मासिक ठेवणे ….इत्यादी)
१९९५ सालातील  “रुपान देऊल बजाज ही आय ए एस अधिकारी महिला, विरुद्ध पंजाबचे तत्कालीन पोलीस महासंचालक के पी एस गिल” हा गाजलेला खटला या संदर्भात आठवतो. त्या खटल्यात प्रथमच “Modesty”  (स्त्रीचा आत्मसन्मान) या शब्दाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले , जेव्हा आपल्याकडे  “कामाच्या ठिकाणी लैंगिक गैरवर्तन ” (Sexual Harassment at  Workplaces) हा कायदा, किंवा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या “विशाखा गाईडलाईन्स ” उपलब्ध नव्हत्या. ह्या खटल्यात के पी एस गिल हे  “भा दं सं कलम ५०९ ” नुसार दोषी ठरले होते. (त्यांनी एका पार्टीत सर्वांच्या देखत त्या महिला अधिकाऱ्याच्या नको त्या ठिकाणी स्पर्श केला / चापट मारली होती.)
यावरून कोणत्या, कशा प्रकारच्या गैरवर्तनासाठी भा दं सं कलम ५०९ उपयोगात येऊ शकते, ते पुरेसे स्पष्ट आहे. संभाजी भिडे यांनी   अशा काही प्रकारचे गैरवर्तन / दुष्कृत्य केले, किंवा ते स्वप्नातही असे काही कधी करतील, असे त्यांचे शत्रूही म्हणणार नाहीत !
एकूण या सर्व प्रकारात जितके संभाजी भिडे यांचे उद्गार विक्षिप्तपणाचे आहेत, तितक्याच महिला आयोग अध्यक्षा चाकणकर  व वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ठाकूर यांच्या प्रतिक्रियाही अतिरंजित आहेत. संभाजी भिडे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या बाबतीत, ते जे बोलतात, त्याचा शाब्दिक कीस न काढता, त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ (Spirit) तेव्हढा लक्षात घेणे आवश्यक आहे.
-श्रीकांत पटवर्धन 
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,974अनुयायीअनुकरण करा
52,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा