30 C
Mumbai
Thursday, June 23, 2022
घरविशेषशरद पवारांनी 'मिटकरीं'चे कान टोचले!

शरद पवारांनी ‘मिटकरीं’चे कान टोचले!

Related

पुन्हा जाती, धर्माविरुद्ध न बोलण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मध्यंतरी ब्राह्मणांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची दखल शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना घ्यावी लागली. ब्राह्मण समाजाच्या संघटनांशी झालेली चर्चा त्याला कारणीभूत ठरली. आपण काही मुद्द्यांवर अस्वस्थ आहोत असे सांगत ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी शरद पवारांना भेटले तेव्हा पवारांची झालेल्या चर्चेनंतर त्यांनी या प्रतिनिधींना आश्वासन दिले. यापुढे जाती, धर्माच्या नावावर कुणी बोलू नये, असे आदेश आपण आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पवार म्हणाले की, या बैठकीसाठी साधारणपणे चाळीस लोक आले होते. त्यात अनेक संघटना होत्या, ९-१० संघटना असाव्यात. त्यांनी काही मुद्दे मांडले. एक म्हणजे त्यांच्यात अस्वस्थता होती. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी विधाने केली त्यासंबंधीची अस्वस्थता होती. मी सांगितले की, विधाने केल्यानंतर आमची चर्चा झाली व पुन्हा या पद्धतीने जाती धर्माविरुद्ध बोलू नका, वक्तव्य करू नका, अशा सूचना मी केल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर मात्र तो विषय त्यांनी अधिक ताणला नाही.

ब्राह्मणांनाही आरक्षण मिळावे अशीही मागणी केली गेली. तेव्हा नोकऱ्यांत ब्राह्मणांच्या आरक्षणाचे सूत्र बसेल असे वाटत नाही, असे आपण सांगितले. या देशाच्या दलित, ओबीसींना आरक्षण द्यावे लागेल. शिक्षणासंदर्भात ते मागे राहिले आहेत. आरक्षणाला विरोध करू नये, असे मी म्हटले.

हे ही वाचा:

केंद्र सरकारकडून देशवासियांना मोठा दिलासा

प्लेसेस ऑफ वर्शिप कायद्याचा पुनर्विचार व्हायला हवा!

पंतप्रधान मोदींनी केले भारताच्या डेफलिम्पिक चमूचे अभिनंदन

प्लेऑफ्स जागेसाठी रॉयल चॅलेंजर्सने बदलले रंग

 

आपल्या राज्यात विकासाला व्यवसायाला मदत करण्यासाठी ब्राह्मणांचे मंडळ, महामंडळे स्थापन करावे. परशुराम महामंडळ या नावाने त्याची स्थापना व्हावी, अशी सूचना केली. यावर मी म्हटले की, हा विषय राज्याचा आहे. माझ्या हातात नाही. तुमचे प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना कळविन.

नवाब मलिक यांच्याबद्दलही पवारांनी विश्वास व्यक्त केला. न्यायालयाने मलिक आणि दाऊद यांच्यातील संबंधांबाबत निरीक्षण मांडले. त्याबद्दल पवार म्हणाले की, नवाब मलिक यांच्या प्रामाणिकतेबद्दल विश्वास आहे. माझ्यावरही टीका झाली. असेच आरोप झाले शेवटी ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातात सत्ते आल्यावर विधिमंडळात भाषण करताना विरोधासाठी विरोध करत असल्याचे सांगितले. न्यायालयाचा हा निकाल नाही त्यांचे मत आहे. निर्णय आल्यावर आम्ही बोलू.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,935चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
10,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा