28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषनिर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच

निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच

Google News Follow

Related

ठाकरे सरकारच्या नव्या निर्बंधांमुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोल्हापूर, नागपूर सारख्या शहरांबरोबरच आता नवी मुंबईतही व्यापाऱ्यांनी कोरोना निर्बंध झुगारून दुकानं उघडी ठेवल्याचं वृत्त समोर येत आहे. ठाकरे सरकारने सात दिवसांसाठी पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु व्यावसायिकांनी सर्व निर्बंध झुगारुन दुकाने सुरुच ठेवण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरुच असल्याचे निदर्शनास येत आहे.

नवी मुंबईमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे महानगरपालिकेने ५ जुलैपर्यंत पुन्हा नवीन निर्बंध लागू केले आहेत. मॉल्स आणि सिनेमागृह बंद केली आहेत. अत्यावश्यक सुविधा वगळून इतर सर्व दुकाने चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

महानगरपालिका आणि पोलिसांनी शहरभर माईकवरुन व्यावसायिकांना आवाहन केले आहे. परंतु वारंवार दुकाने बंद ठेवल्याने व्यवसायाचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने रात्री ८ नंतरही सुरु ठेवली जात आहेत.

मंगळवारी नेरूळ परिसरात किराणा माल, हॉटेल आणि इतर दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु होती. अनेकांनी अर्धे शटर बंद करुन व्यवसाय सुरु ठेवला होता. सानपाडा रेल्वे स्टेशन समोरील खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने रात्री ८ नंतरही सुरु होती. स्टेशन समोर गर्दी झाली होती. शहरात सर्वच विभागात असे चित्र पहावयास मिळत होते.

हे ही वाचा:

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी

शिवसेनेला ‘व्हीप’ची गरज का पडली?

ठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात

पंतप्रधान मोदींनी बोलावली संरक्षण विषयक बैठक

महानगरपालिका व पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई होत नाही. कारवाई करण्यासाठी यंत्रणाही अपुरी आहे. प्रशासनासही गांभीर्य राहिले नसल्याची टीका होऊ लागली आहे. ९० टक्के नागरिक नियमांचे पालन करतात. परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा टक्के नागरिकांमुळे सर्व शहरवासीयांना फटका बसत आहेत. प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा