27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषएस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर !

एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर !

३१ पैकी १८ विभागांनी जुलै महिन्यात कमावला नफा

Google News Follow

Related

गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाम मात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै,2024 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे. जुलै महिन्यात नफा कमावणाऱ्या विभागांचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले असून, उर्वरित विभागांनी देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महामंडळ फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या 53 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

हेही वाचा..

बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराबद्द्ल रिपब्लिकन नेत्याने केला निषेध

तुरुंगवास भोगलेल्या माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्याबद्दल थायलंडच्या पंतप्रधानांची हकालपट्टी

पश्चिम बंगालमधील बलात्काराबद्दलचा प्रश्न महुआ मोईत्रांना झोंबला, अजित अंजुमना केले ब्लॉक

आठवीच्या प्रश्नपत्रिकेत पाच पैकी चार प्रश्न इस्लामशी निगडीत

याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ” हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून जुलै महिन्यामध्ये ३१ विभागांपैकी १८ विभाग नफ्यामध्ये आले आहेत. त्यापैकी जालना (३.३४कोटी), अकोला (३.१४कोटी), धुळे (३.७ कोटी), परभणी (२.९८ कोटी), जळगाव (२.४० कोटी), बुलढाणा (२.३३ कोटी) या ‍विभागांनी २ कोटी पेक्षा जास्त नफा कमावला आहे.

ऑगस्ट महिन्यात उर्वरित विभाग देखील नफ्यामध्ये येतील व पर्यांयाने महामंडळ नफ्यात येईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे. (दि.१४ ऑगस्ट,२०२४) – गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाम मात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै,2024 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांनी तोटा कमी झाला आहे. जुलै महिन्यात नफा कमावणाऱ्या विभागांचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले असून, उर्वरित विभागांनी देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महामंडळ फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या 53 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ” हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून जुलै महिन्यामध्ये ३१ विभागांपैकी १८ विभाग नफ्यामध्ये आले आहेत. त्यापैकी जालना (३.३४कोटी), अकोला (३.१४कोटी), धुळे (३.७ कोटी), परभणी (२.९८ कोटी), जळगाव (२.४० कोटी), बुलढाणा (२.३३ कोटी) या ‍विभागांनी २ कोटी पेक्षा जास्त नफा कमावला आहे.

ऑगस्ट महिन्यात उर्वरित विभाग देखील नफ्यामध्ये येतील व पर्यांयाने महामंडळ नफ्यात येईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा