30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरविशेषएसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे!

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे!

Google News Follow

Related

कोरोना महामारीमुळे समाजातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आर्थिक स्थितीवरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधाचा चांगलाच तडाखा बसला आहे. परिवहन मंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप दिलेले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एका एसटी बस चालकाने नैराश्यातून आत्महत्या घडल्याची घटना साक्रीत घडली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जुलैचे वेतन लवकरात लवकर देण्यात यावे म्हणून आगाराबाहेर आज आंदोलन करण्याचा निर्णय संघर्ष एसटी कामगार युनियनने घेतला आहे.

कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले असताना आता ऑगस्ट महिना संपला तरी जुलै महिन्याचे वेतन अजून दिलेले नाही. ऑगस्टमध्ये वेतन वेळेत मिळावे म्हणून औद्योगिक न्यायलयात याचिका केली होती. १४ ऑगस्टला न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देऊन वेतन तातडीने देण्यात यावे, असे आदेश दिले. तरीही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही.

हे ही वाचा:

सीबीआयने म्हणे राहुल गांधींना अहवाल पाठवला, पोगो पाहणारेच यावर विश्वास ठेवतील!

अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट

अनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

गरिबी आणि दारिद्र्याला कंटाळून चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष जगनारायण कहार यांनी केला आहे. सोमावारी एसटी महामंडळाविरोधात राज्यभरातील महामंडळांच्या आगाराबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन हे कामाची वेळ संपल्यावर करण्यात येईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले. एक उपेक्षित कर्मचारी म्हणून आपल्या हक्कांसाठी या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन संघर्ष एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

एसटीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कर्जाचा डोंगर एसटीवर आहेच पण कामगारांना वेतन देणेही शक्य होत नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी पत्र लिहून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थापन, सरकार यांच्यावर प्रहार केला आहे. पण त्यांना कुणीही दाद देत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा