चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की भारताच्या सहनशीलतेची एक मर्यादा आहे, आणि पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद आता थांबवला गेला पाहिजे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ वर बोलताना जनरल चौहान म्हणाले की, “भारत आता ना दहशतीच्या सावलीखाली राहणार आहे, ना अणु ब्लॅकमेल सहन करणार आहे”. त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे उल्लेख करत हे हल्ले पीडितांविरुद्धची क्रूरता असल्याचे सांगितले.
ऑपरेशन सिंदूर बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या ऑपरेशनचा उद्देश पाकिस्तानकडून चालवला जाणारा दहशतवाद संपवणे हाच होता. सीडीएस म्हणाले, “पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देऊ शकत नाही. भारत अशा कारवायांबाबत आता गप्प बसणार नाही.” त्यांनी यावेळी १९६५ मध्ये झुल्फिकार अली भुट्टोंनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताविरोधात ‘हजार वर्षांच्या युद्धा’ची घोषणा केली होती, हेही आठवले.
त्यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर हे सूड घेण्यासाठी नव्हते, तर भारताच्या सहनशीलतेची एक मर्यादा आहे हे दाखवण्यासाठी होते.” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘भविष्यातील युद्ध आणि युद्धनीती’ या विषयावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, “दहशतवादाला कोणताही तर्कशुद्ध आधार नसतो. युद्धात नुकसान महत्त्वाचे नसते, तर त्याचे परिणाम महत्त्वाचे असतात.” त्यांनी क्रिकेटचा उदाहरण देत सांगितले, “जर तुम्ही टेस्ट मॅचमध्ये इनिंगने सामना जिंकला, तर किती चेंडू लागले, किती विकेट गेले, याला अर्थ नसतो.”
हेही वाचा..
मुख्यमंत्री मोहन यादव यांचा राहुल गांधींवर हल्ला
विशेष अधिवेशन वगैरे नाही, थेट पावसाळी अधिवेशनच!
केरळमध्ये कोविड रुग्णसंख्या वाढली !
जनरल चौहान यांनी स्पष्ट केले की ७ मे रोजी झालेल्या स्ट्राईकबाबत भारताने पाकिस्तानला पूर्वसूचना दिली होती. या कारवाईत केवळ दहशतवाद्यांचे तळच लक्ष्य करण्यात आले. त्यांनी सांगितले की, जर पाकिस्तानने आमच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं, तर “आपणही उत्तर देऊ आणि त्याहून अधिक कठोर कारवाई करू”.
