दिल्ली हायकोर्टानं मंगळवारी ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखड हत्या प्रकरणात मुख्य आरोपी ऑलिम्पियन सुशील कुमारला जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती संजीव नरूला यांच्या पीठानं दिलेल्या आदेशानुसार, सुशील कुमारला ५० हजार रुपयांचा जामीन जमा करावा लागेल तसेच इतक्याच रकमेचे दोन जामीनदारही सादर करावे लागतील.
सुशील कुमारवर आरोप आहे की, ४ मे २०२१ रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये, त्यानं आपल्या साथीदारांसह हरियाणातील रोहतक रहिवासी आणि माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखड, त्याचे मित्र सोनू आणि अमित कुमारवर हल्ला केला. हा हल्ला संपत्ती वादाच्या कारणावरून झाल्याचं सांगितलं जातं.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज
भोपाळमध्ये महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार उभारणार
वनतारा येथील केंद्रातील वन्यजीवांवर पंतप्रधान मोदींची मायेची फुंकर
भाजपच्या बिहार प्रदेशाध्यक्षपदी दिलीप जायसवाल
हल्ल्यानंतर सागर धनखडचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम अहवालात सागरच्या मृत्यूचं कारण देण्यात आले की, त्याला कुठल्यातरी जड वस्तूने मारहाण झाली. त्याच्या मेंदूला त्यामुळे गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सुशील कुमार १८ दिवस फरार होता आणि या दरम्यान पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये लपून राहत होता. अखेर त्याला दिल्लीच्या मुंडका परिसरातून अटक करण्यात आली. जेव्हा तो नकदी घेण्यासाठी आला होता आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूकडून स्कूटी उधार घेतली होती.
अटकेनंतर सुशील कुमारला रेल्वेतील नोकरीवरून निलंबित करण्यात आलं होतं. ऑक्टोबर २०२२ मध्ये ट्रायल कोर्टानं सुशील कुमार आणि १७ इतर आरोपींवर हत्या, दंगल आणि आपराधिक कट अशा गंभीर कलमांखाली आरोप निश्चित केले. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुशील कुमारला या हत्येचा मास्टरमाइंड म्हटलं आहे. यापूर्वी, त्याला वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी आणि लिगामेंट सर्जरीसाठी अंतरिम जामीन देण्यात आला होता.
सुशील कुमारनं २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केलं होतं.