भारताची शेअर बाजार नियामक संस्था SEBI ने IIFL सिक्युरिटीजचे माजी कार्यकारी संजिव भसीन यांना टीव्ही आणि सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या स्टॉक शिफारशी केल्याच्या आरोपावरून बाजारातून तात्पुरते निलंबित केले आहे.
SEBI च्या अंतरिम आदेशात म्हटले आहे की, भसीन यांनी काही शेअर्स आधी खरेदी केले आणि नंतर Zee Business, ET Now सारख्या व्यवसायिक वाहिन्यांवर तसेच IIFL च्या टेलीग्राम चॅनेलवर त्या शेअर्सची जोरदार शिफारस केली. या सार्वजनिक शिफारशीमुळे संबंधित स्टॉक्सचे भाव वाढले आणि त्यानंतर भसीन यांनी स्वतःचे शेअर्स विकून नफा कमावला, असे SEBI ने म्हटले आहे.
हे ही वाचा:
मोदींचा काँग्रेस, लालू यादवांच्या घराणेशाहीवर आरोप; परिवार का साथ, परिवार का विकास!
आसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!
उत्तर प्रदेश पोलिसांनी ८ वर्षांत २३४ अट्टल गुन्हेगारांना धाडले यमसदनी
नाबर गुरुजी शाळा बंद पडली, राज ठाकरेंनी काय केले ?
भसीन यांच्याकडून या आदेशावर कोणतीही त्वरित प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यांचा IIFL बरोबरचा करार जून 2024 मध्ये संपला आहे. IIFL Securities ने एका निवेदनात सांगितले की, भसीन यांनी कंपनीला SEBI च्या तपासाची माहिती दिली होती, मात्र तपशील उघड केला नव्हता. ते IIFL Securities च्या किंवा कोणत्याही गट कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य नव्हते,” असे कंपनीने स्पष्ट केले.
SEBI ने भसीन यांच्या १ जानेवारी २०२० ते १२ जून २०२४ दरम्यानच्या स्टॉक शिफारसी आणि ट्रेडिंग व्यवहारांची चौकशी केली होती. नियामक संस्थेने भसीन आणि त्यांच्या सहाय्यकांकडून मिळवलेल्या ₹११.३७ कोटी (अंदाजे \$1.3 दशलक्ष) ‘बेकायदेशीर नफ्याची’ रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
