२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील १०० प्रसिद्ध स्थळे आणि ५० इतर सांस्कृतिक स्थळांवर योग सत्रांचे आयोजन करणार आहे, ज्यामध्ये युनेस्कोच्या काही वारसा स्थळांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील विखापट्टणम समुद्रकिनाऱ्यावर योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी विक्रमी पाच लाख लोक योग करू शकतील यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान, या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची जागतिक थीम “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” आहे.
आरके बीच ते भिमिली पर्यंत असे २६ किमीचे अंतर असून याठिकाणी बॅरिकेड्स, रस्त्यावर मॅट्स, इलेक्ट्रिक लाईट्स, एलईडी स्क्रीन आणि ट्रेनरसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत. पाऊस पडल्यास कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी आंध्र विद्यापीठात पर्यायी ठिकाणे तयार केली जात आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, सरकारच्या वतीने राज्यस्तरावर आयोजित विविध वयोगटातील स्पर्धांमधील १७९ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व विजेते आरके बीचवरील योग महोत्सवात सादरीकरण करतील.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी (२० जून) संध्याकाळी ६.४० वाजता विशेष विमानाने विशाखापट्टणमला पोहोचतील. स्वागत समारंभानंतर ते संध्याकाळी ६.४५ वाजता निघतील. त्यानंतर ते ईस्टर्न नेव्हल कमांड ऑफिसर्स मेस गेस्ट हाऊसमध्ये जातील, जिथे ते रात्री मुक्काम करतील. २१ तारखेला ते सकाळी ६ वाजता आरके बीचला रस्तेमार्गे रवाना होतील. ते सकाळी ६.२५ वाजता पोहोचतील.
योग समारंभानंतर, ते संध्याकाळी ७.५० वाजता निघतील आणि सकाळी ८.१५ वाजता नौदल अतिथीगृहात जातील. दुसऱ्या दिवशी ते सकाळी ११.२५ वाजता हेलिकॉप्टरने परत येतील आणि सकाळी ११.४५ वाजता आयएनएस देगा येथे पोहोचतील. ते सकाळी ११.५० वाजता दिल्लीला रवाना होतील.
हे ही वाचा :
गैरव्यवहार केल्याप्रकरणी IIFL चे माजी कार्यकारी अधिकारी संजीव भसिन यांना डच्चू
आसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!
उद्धवजी गरळ ओका, टोमणे मारा… पण जनतेची साथ महायुतीलाच!
मोदींचा काँग्रेस, लालू यादवांच्या घराणेशाहीवर आरोप; परिवार का साथ, परिवार का विकास!
दरम्यान, ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील १०० पर्यटनस्थळे आणि ५० हून अधिक सांस्कृतिक स्थळांवर योग सत्रांचे आयोजन करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत राजस्थानमधील जोधपूर येथील ऐतिहासिक मेहरानगड किल्ल्यावर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.