दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात बेस्ट बसने एका ८४ वर्षीय महिलेला दिलेल्या धडकेत तीचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे ज्या बस अपघात या महिलेचा मृत्यू झाला, त्याच बसमधून ही महिला प्रवास करीत होती. भायखळा पोलिसांनी या अपघातप्रकरणी बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत मागील २४ तासांत १० बांगलादेशी घुसखोरांना अटक
अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोट भस्मसात!
तेलुगू भाषेतही आता ‘छावा’ची गर्जना!
आस्मा बेन तैयब अली अंत्री असे पीडित महिलेचे नाव आहे. ती माझगाव येथील लव्ह लेन येथे एका नातेवाईकासोबत राहत होती. शुक्रवारी सकाळी ती एका मशिदीत गेली होती आणि घरी परतताना बेस्ट बसमध्ये चढली. बस लव्ह लेन बस स्टॉपवर येत असताना, महिला प्रवासी त्या ठिकाणी उतरली आणि अचानक बसच्या पुढच्या बाजूने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ती ज्या बसमधून उतरली त्याच बसच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आली, त्यात तिचा मृत्यू झाला.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला चालकाला ही महिला प्रवासी दिसून आली नाही, परंतु पादचाऱ्यांनी आरडाओरडा केला असता बस चालकाने बस थांबवली, जखमी झालेल्या महिलेला तातडीने सर जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच भायखळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले,त्यांनी बस चालकाला ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दादू कृष्ण आगिवले चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.