चौथीच्या वर्गातील मुलांमध्ये झालेल्या मारामारीचे पडसाद वयाच्या साठीत उमटल्याची घटना केरळमध्ये घडली. साठीत असलेली ही सगळी मित्रमंडळी एकत्र आली आणि तिथे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटली. त्यातून दोघांना अटक करण्यापर्यंत प्रकरण ताणले गेले.
केरळच्या कासरगोड जिल्ह्यात ५० वर्षांपूर्वीच्या बालपणीच्या वादातून एका ६२ वर्षांच्या व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी बालकृष्णन आणि मॅथ्यू वळियप्लक्कल या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी बालकृष्णनचा माजी वर्गमित्र व्ही. जे. बाबू याच्यावर २ जून रोजी हल्ला केला. हा हल्ला त्यांच्या एका अनौपचारिक शालेय मेळाव्यानंतर काही दिवसांनी झाला, असे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानी नागरिक अमेरिकेत डिपोर्ट
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला विमानतळावर मारहाण!
यमनच्या हूती गटाने क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
कडवट मेथी दाण्यांत लपलाय गोडवा
४ थीत झालेल्या वादाचा सूड?
एफआयआरनुसार, बालकृष्णनने बाबूवर सूड म्हणून हल्ला केला कारण चौथी इयत्तेत बाबूने त्याच्यावर हल्ला केला होता, असा त्याचा दावा आहे. दोघांमध्ये त्या जुन्या घटनेवरून पुन्हा एकदा शाब्दिक वाद झाला होता, पण तो त्या वेळी मिटला होता. मात्र, २ जून रोजी बालकृष्णन आणि मॅथ्यूने बाबूला पुन्हा सामोरे जात विचारले, ‘तू चौथीत माझ्यावर का हल्ला केला होता?’ या वादातून बाबूवर हल्ला झाला.
कॉलर पकडून दगडाने मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकृष्णनने बाबूची कॉलर पकडली आणि मॅथ्यूने त्याच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर दगडाने मारले. सध्या बाबूवर कन्नूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, परियारम येथे उपचार सुरू आहेत.
भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
-
कलम १२६(२) – चुकीची अडवणूक
-
कलम ११८(१) – धोकादायक शस्त्र किंवा साधन वापरून दुखापत करणे
-
कलम ३(५) – अनेक व्यक्तींनी एकत्रित हेतूने केलेला गुन्हा
