34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरक्राईमनामाराम रहीम दोषी; सीबीआय न्यायालय सुनावणार १२ ऑक्टोबरला शिक्षा

राम रहीम दोषी; सीबीआय न्यायालय सुनावणार १२ ऑक्टोबरला शिक्षा

Related

हरियाणातील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमसह पाच आरोपींना १९ वर्षे जुन्या रणजित सिंह हत्याकांडात सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना १२ ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहिमसह, कृष्ण लाल, सबदिल, अवतार, जसबीर असे पाच आरोपी आहेत.

हे प्रकरण १९ वर्षांपूर्वीचे आहे. १२ ऑगस्टला त्याची अखेरची सुनावणी झाली होती. त्याचा निकाल २६ ऑगस्टलाच लागणार होता, पण काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला. आता या पाच आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे.

डेरा सच्चा सौदामध्ये व्यवस्थापक असलेल्या रणजितसिंह याची २००२मध्ये हत्या झाली होती. साध्वीच्या लैंगिक शोषणाचे निनावी पत्र रणजितसिंहने लिहून घेतल्याचे डेराच्या व्यवस्थापनाला वाटत होते. त्यामुळे त्याची हत्या झाली होती. २००३ला राम रहीमसह काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. २००७ला आरोप निश्चित केले गेले. सध्या साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात राम रहीम २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. तर पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या हत्येचाही त्याच्यावर आरोप आहे.

 

हे ही वाचा:

रस्त्याच्या कामांसाठीची महापालिकेच्या फेरनिविदा

नरेंद्र मोदींनी मनात आणलं तर क्षणात कोलमडेल पाकिस्तान क्रिकेट

महिलेची छेड काढणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधीक्षकाला अटक

‘प्ले ऑफ’ मध्ये जागा मिळवणार मुंबईचा संघ? वाचा विजयाचे सूत्र!

 

रणजितसिंह हत्येप्रकरणात डेराप्रमुख गुरमित राम रहीम, कृष्णकुमार हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर झाले होते तर आरोपी अवतार, जसबीर, सबदिल हे थेट न्यायालयात हजर झाले होते. सीबीआयच्या न्यायालयातील न्यायाधीश डॉ. सुशीलकुमार गर्ग यांनी सुमारे अडीच तास झालेल्या युक्तिवादानंतर आरोपींना दोषी ठरविले आहे. राम रहीमसारख्या भोंदू संतांचे बिंग यामुळे पुन्हा एकदा फुटले आहे. राम रहीम या भोंदूने स्वतःवर आधारित चित्रपटही काढला होता. शिवाय, त्याच्या मठात साध्वींचे लैंगिक शोषणही होत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा